एकच मिशन... जुनी पेन्शन, पेन्शन नाही तर मतदान नाही; सोलापुरातील परिचारिकांचा निर्धार
By रवींद्र देशमुख | Published: March 14, 2023 01:08 PM2023-03-14T13:08:14+5:302023-03-14T13:08:52+5:30
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या पूनम गेटवर परिचारिका संघटनांनी विविध मागण्यांबाबत आंदोलन केले
रवींद्र देशमुख/सोलापूर
सोलापूर : जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे शेकडो कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. एकच मिशन..जुनी पेन्शन..पेन्शन नाही तर मतदान नाही...अशा घोषणा देत परिचारिकांनी बेमुदत संपात उडी घेतली.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या पूनम गेटवर परिचारिका संघटनांनी विविध मागण्यांबाबत आंदोलन केले. १४ मार्चपासून जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यासाठी सरकारी, निमसरकारी, शिक्षक शिक्षकेतर, महानगरपालिका नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषद कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र मार्फत राज्य मार्फत कर्मचारी व शिक्षकांनी राज्यव्यापी बेमुदत संप घोषित करण्यात आला आहे. राज्यातील २००५ नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्याना जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी. या प्रमुख मागणीसह इतर जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले.
या बेमुदत संपात श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूरची संघटना सहभागी झाली होती. यावेळी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष आशा कसबे, आशा माने -पाटील, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सुतार, जिल्हासचिव संध्या गावडे, सहसचिव शशिकांत साळवी, जिल्हा कार्याध्यक्ष नागराज वामने, ज्योती चावरीया, जिल्हा उपाध्यक्ष अपर्णा पानसरे, मीरा सर्वगोड, सहसचिव मीरा चव्हाण, ज्ञानेश्वर जोशी, आशा माने, सहखजिनदार ओंकार कर्णेकर, अभिजीत बेगमपूरे, कल्पना देवकते आदी उपस्थित होते.