स्वयंपाक घरात साप शिरला जेवण बनवणाऱ्या मुलीस दंश!
By दिपक दुपारगुडे | Published: January 6, 2024 08:18 PM2024-01-06T20:18:37+5:302024-01-06T20:18:50+5:30
तातडीने मामा बद्री अलहावे यांनी पंढरपूरच्या सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचार केले.
सोलापूर : किचनमध्ये स्वयंपाक करणाऱ्या १४ वर्षीय मुलीला सापाने डंख मारल्याने तिला तातडीने दवाखान्यात हलवावे लागले. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास पंढरपूर तालुक्यातील कोंढारके येथे ही घटना घडली. रंजना रमेश चव्हाण (वय- १४, रा, भोपाडा, ता. शिरवळ, जि. खरगोड, सध्या कोंढारके, ता. पंढरपूर) असे या मुलीचे नाव आहे.
यातील मुलगी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास कोंढारके येथील घरामध्ये जेवण बनवत होती. या दरम्यान घरामध्ये शिरलेला सापाने तिला डंख मारला. अचानक घडलेल्या या प्रकाराने ती ओरडली. शोधाशोध करता साप दिसला. तातडीने मामा बद्री अलहावे यांनी पंढरपूरच्या सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचार केले.
डॉक्टरांच्या सल्ल्याने येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर उपचार सुरु असून, ती शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.