Solapur | महावीर चौकात ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 23:29 IST2022-12-25T23:26:03+5:302022-12-25T23:29:52+5:30
रस्त्यावर विखुरला ऊस, सुदैवाने अनर्थ टळला

Solapur | महावीर चौकात ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी
विलास जळकोटकर, सोलापूर: सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे ऊस घेऊन निघालेला ट्रॅक्टर महावीर चौकात अचानक पलटी झाला यामुळे सबंध ऊस रस्त्यावर विखुरला गेला यामुळे अर्धा तास वाहतूक खोळंबली. ही घटना रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.
सोलापूर: महावीर चौकात ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी (व्हिडीओ- विलास जळकोटकर) pic.twitter.com/AtwWvka2Db
— Lokmat (@lokmat) December 25, 2022
मिळालेली अधिक माहिती अशी की ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर हा सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे निघाला होता महावीर चौक पार करीत असताना अचानक तो पालथा झाला याच दरम्यान गांधीनगर कडे निघालेल्या एक दुचाकी स्वार एक कार आणि रिक्षा थोडक्यात बचावले यातील एका तरुणास किरकोळ दुखापत झाली आहे त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आले आहे.