बेदाणा घेऊन निघालेल्या ट्रकला मागून ट्रॅव्हलची धडक
By काशिनाथ वाघमारे | Updated: June 3, 2024 19:38 IST2024-06-03T19:38:29+5:302024-06-03T19:38:54+5:30
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील फिर्यादी चालक शेख याने ट्रक (एम.एच. २४ / ए. यू. ०१२७) मधून सांगली येथून बेदाणा बॉक्स भरून पहाटे ३ जून रोजी निघाला होता.

बेदाणा घेऊन निघालेल्या ट्रकला मागून ट्रॅव्हलची धडक
काशिनाथ वाघमारे
सोलापूर: सांगली येथून बेदाणा घेऊन बार्शीमार्गे कुर्डुवाडी रोडवरून नागपूरला निघालेल्या ट्रकला मागून येणाऱ्या ट्रॅव्हलची धडक बसली. या अपघातात बेदाणा मालाचे बॉक्स फुटले आणि दोन्ही वाहनांचे तीन ते चार लाखांचे नुकसान झाले. याप्रकरणी ट्रॅव्हलमधील तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले.
ही घटना ३ जून रोजी पहाटे ५ च्या सुमारास कुर्डुवाडी रोडवर शेंद्री फाट्यावर गतिरोधक ओलांडताच घडली. याबाबत ट्रकचालक इस्माईल बबन शेख (वय २४, रा. सताळा, ता. अहमदपूर, जि. लातूर) यांनी बार्शी तालुका पोलिसात ट्रॅव्हल चालक धोंडिराव सुगावकर (रा. नवकुंडझरी ता. चाकूर जिल्हा लातूर) याच्याविरुद्ध तालुका पोलिसात तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील फिर्यादी चालक शेख याने ट्रक (एम.एच. २४ / ए. यू. ०१२७) मधून सांगली येथून बेदाणा बॉक्स भरून पहाटे ३ जून रोजी निघाला होता.
कुर्डुवाडी रोडवर शेंद्री फाट्यावरील गतिरोधक ओलांडून पुढे येताच मागून येणाऱ्या ट्रॅव्हल्स (एम.एच. ४४ : ९३९३) ने जबर धडक दिली. ट्रॅव्हल्समधील ३ ते ४ प्रवासी किरकोळ जखमी झाले तर बेदाण्याचे बॉक्स फुटून तीन ते चार लाखाचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.