सिद्धेश्वर तलावात सापडले अनोखे चतुर्मुख शिवलिंग!

By Appasaheb.patil | Published: June 9, 2023 07:22 PM2023-06-09T19:22:56+5:302023-06-09T19:23:24+5:30

मागील काही दिवसांपासून सोलापुरातील युवकांनी श्री सिध्देश्वर तलाव स्वच्छतेचा विडा उचलला आहे. 

A unique four-faced Shivling found in Siddheshwar lake! | सिद्धेश्वर तलावात सापडले अनोखे चतुर्मुख शिवलिंग!

सिद्धेश्वर तलावात सापडले अनोखे चतुर्मुख शिवलिंग!

googlenewsNext

सोलापूर : स्थानिक युवकांच्या पुढाकाराने श्री सिद्धेश्वर तलावाच्या काठाने असलेले निर्माल्य, पाण्याच्या बाटल्या, नारळ व इतर वस्तू दर आठवड्यातून एकदा येऊन स्वच्छता केली जाते. या स्वच्छता मोहिमे दरम्यान युवकांना गाळातून एक शिवलिंग सापडले. मागील काही दिवसांपासून सोलापुरातील युवकांनी श्री सिध्देश्वर तलाव स्वच्छतेचा विडा उचलला आहे. 

आठवड्यातून एक दिवस शहरातील युवक तलावाची स्वच्छता करतात. अशीच स्वच्छता मोहिम राबविताना हे शिवलिंग सापडले. महेश धाराशिवकर यांनी सांगितले की, इतिहास संशोधक नितीन अनवेकर यांच्याशी चर्चा करून दयानंद महाविद्यालय येथील वास्तु संग्रहालयास हे शिवलिंग भेट देण्याचा मानस आहे. ज्यायोगे अभ्यासकांना शिवलिंगाविषयी अभ्यास करता येईल व जिज्ञासूंना ते पाहता येईल. 

या मोहिमेत महेश धाराशिवकर, प्रताप चव्हाण, मनोज कामेगावकर, वैशाली टंकसाळी, दीपक कळमनकर, वैष्णव धाराशिवकर, राहुल वांगी, पिंटू कानेगावकर, समर्थ खिलारे, मुक्ताई धाराशिवकर, धनराज धाराशिवकर, विनोद पाटील, धनराज कोरे, दर्शन शिरोळे, रोहित व्हनमाने, श्रीराम व्यवहारे, विनायक जाये, उत्कर्ष ढेपे, नागराज कडघंची, मयूर माने आदी सदस्यांनी श्रमदान केले.

असे आहे शिवलिंगाची रचना...
या शिवलिंगाची रचना चतुर्मुखी असून अशा प्रकारची शिवलिंगे व मंदिरे हिमाचल प्रदेश व नेपाळ या प्रदेशात प्रामुख्याने आढळतात. यात काठमांडू येथील पशुपतिनाथ मंदिरातील शिवलिंग चार मूक असलेले आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता हे चतुर्मुख लिंग चार दिशांची व देवाच्या चार पैलूंची प्रतिनिधित्व करते. निर्मिती क्रोध सौम्यता व तपस्वी स्व शिस्त सदरचे शिवलिंग काही कारणास्तव कोणत्या तरी भाविकाने तळ्यात टाकल्याचा अंदाज आहे.

Web Title: A unique four-faced Shivling found in Siddheshwar lake!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.