लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने मोहोळ येथील नवरदेवांचे सोलापुरात अनोखे आंदोलन

By Appasaheb.patil | Published: December 21, 2022 03:08 PM2022-12-21T15:08:56+5:302022-12-21T15:09:09+5:30

राज्यामध्ये दिवसेंदिवस मुलींची संख्या कमी होत चालल्यामुळे तरुण मुलांच्या लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण झाले आहे.

A unique movement of the bridegrooms of Mohol in Solapur as they are not getting a girl for marriage | लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने मोहोळ येथील नवरदेवांचे सोलापुरात अनोखे आंदोलन

लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने मोहोळ येथील नवरदेवांचे सोलापुरात अनोखे आंदोलन

googlenewsNext

सोलापूर :

राज्यामध्ये दिवसेंदिवस मुलींची संख्या कमी होत चालल्यामुळे तरुण मुलांच्या लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण झाले आहे. अनेक तरुण लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत. मुलांची लग्न न झाल्यामुळे आईबापाची काळजी दिवसेंदिवस वाढत चालली असून, त्यांना वेगवेगळ्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. याबाबत सरकारने योग्य धोरण राबवावे या मागणीसाठी लग्नाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक नवरदेवांचा मुंडवळ्या बांधून जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्हाला बायको मिळवून द्या, या मागणीसाठी ज्योती क्रांती परिषदेच्या वतीने मोर्चा काढला. 

या मोर्चात सहभागी झालेले मुलं लग्नातील नवरदेवासारखी नटली होती. त्याची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. या मोर्चात शेकडो अविवाहित मुलं सहभागी झाले होते. या आगळ्या वेगळ्या मोर्चाने सोलापूरकरांचे लक्ष वेधले. या मोर्चाचे नेतृत्व ज्योती क्रांती परिषदेचे संस्थापक रमेश बारस्कर यांनी केले होते. 

दरम्यान, सरकारने केलेल्या कायद्यामुळे लोकसंख्येवर निर्बंध आले आहेत. मात्र, गर्भलिंग निदान चाचणीचा कायद्याची अंमलबजावणी राज्यामध्ये नियमानुसार होत नाही. महाराष्ट्रासह परराज्यामध्ये गर्भलिंग निदान चाचणीच्या माध्यमातून मुलींऐवजी मुलांना प्राधान्य देण्यात येत असल्यामुळे मुलींची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या पिढीचे भविष्य अंधकारमय झाले आहे. वेळेत लग्न जमत नसल्याने मुले व्यसनाधीन होत आहेत.

पर्यायाने देशातील राज्यातील तरुण शक्ती कमकुवत होत चालली आहे. यांना सशक्त करणे ही सरकारची जबाबदारी असून याबाबत सरकारने विचार करावा. जिल्ह्यातल्या लग्न न झालेल्या अनेक तरुण मुलांचा विचार करून तरुणांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोहोळ परिसरातील लग्न न झालेल्या नवरदेवांचा डोक्याला मुंडवळ्या बांधून मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही यावेळी बारसकर यांनी सांगितले.

Web Title: A unique movement of the bridegrooms of Mohol in Solapur as they are not getting a girl for marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.