जेसीबीतून फुले उधळली, क्रेनद्वारे हार घातले; सोलापुरात शरद पवारांचं जंगी स्वागत, कार्यकर्त्यांचे शक्तीप्रदर्शन

By राकेश कदम | Published: August 13, 2023 02:37 PM2023-08-13T14:37:05+5:302023-08-13T14:37:47+5:30

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार शहर आणि जिल्हा राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत.

A warm welcome to Sharad Pawar in Solapur, a show of strength by activists | जेसीबीतून फुले उधळली, क्रेनद्वारे हार घातले; सोलापुरात शरद पवारांचं जंगी स्वागत, कार्यकर्त्यांचे शक्तीप्रदर्शन

जेसीबीतून फुले उधळली, क्रेनद्वारे हार घातले; सोलापुरात शरद पवारांचं जंगी स्वागत, कार्यकर्त्यांचे शक्तीप्रदर्शन

googlenewsNext

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे रविवारी सोलापुरातील कार्यकर्त्यांनी जेसीबीतून फुलांची उधळण, क्रेनव्दारे हार घालून जंगी स्वागत केले. चौका-चौकात गर्दी जमवून शक्तीप्रदर्शन केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार शहर आणि जिल्हा राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील तीन आमदार अजितदादांच्या बाजूने तर संघटनेतील पदाधिकारी शरद पवार यांच्या बाजूने आहेत. राष्ट्रवादीतील घडामोडीनंतर एका आयटी प्रकल्पाच्या भूमीपूजन कार्यक्रमासाठी शरद पवार यांचे रविवारी सोलापुरात आगमन झाले.

पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी होटगी रोड विमानतळ ते सात रस्ता ते सलगर वस्ती या कमानी, स्वागताचे फलक, चौकाचौकात गर्दी जमवून स्वागत केले. आसरा चौक, सात रस्ता, माेदी पोलीस चौकी, सेटलमेंट परिसर या भागात जेसीबीतून गुलाबाची फुले उधळून पवारांचे स्वागत करण्यात आले. पवार गट युवक अध्यक्ष पदासाठी इच्छूक असलेल्या पदाधिकाऱ्यांनी तीन ठिकाणी क्रेनव्दारे हार घालून स्वागत केले. सलगर वस्ती येथील भूमीपूजन कार्यक्रमानंतर पवार सांगोल्यात दाखल झाले.

Web Title: A warm welcome to Sharad Pawar in Solapur, a show of strength by activists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.