घर खाली करण्यासाठी कोत्याचा धाक दाखवून महिलेसह अल्पवयीन मुलीस धक्काबुक्की
By दिपक दुपारगुडे | Updated: July 11, 2024 18:37 IST2024-07-11T18:37:08+5:302024-07-11T18:37:18+5:30
घर खाली करण्यासाठी कोयता अन् कुऱ्हाडीचा धाक दाखवून महिलेसह अल्पवयीन मुलीशी धक्काबुक्की केल्याप्रकरणी सहाजणांविरुद्ध बुधवारी रात्री मारहाणीसह पोक्सोचा गुन्हा नोंदला आहे.

घर खाली करण्यासाठी कोत्याचा धाक दाखवून महिलेसह अल्पवयीन मुलीस धक्काबुक्की
सोलापूर : घर खाली करण्यासाठी कोयता अन् कुऱ्हाडीचा धाक दाखवून महिलेसह अल्पवयीन मुलीशी धक्काबुक्की केल्याप्रकरणी सहाजणांविरुद्ध बुधवारी रात्री मारहाणीसह पोक्सोचा गुन्हा नोंदला आहे. हा प्रकार भवानी पेठेतील मड्डी वस्ती येथे घडला.आप्पाराव कांबळे, धनाजी चौगुले, बबलू इनामदार, रेशमा, प्रतिक्षा कांबळे, वॉचमन धनाजी याची पत्नी (रा. सोलापूर) अशी गुन्हा नोंदलेल्यांची नावे आहेत.
पिडित ४० वर्षीय महिलेने फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादीसह घरातील नातलगा ४ जुलै रोजी सकाळी आठच्या सुमारास दैंदिन कामात व्यस्त असताना नमूद आरोपी कोयता व कुऱ्हाड घेऊन आले. आरडा ओरडा करु लागल्याने फिर्यादीची १४ वर्षाच्या मुलगी घाबरली. नमूद आरोपी घरात शिरण्याचा प्रयत्न करीत असता त्यांना फिर्यादी व त्यांची मुगगी, दीर प्रकार करताना धक्काबुक्की व शिवीगाळ केली.
दरम्यान, पिडितेने ११२ क्रमांकाला फोन केला असता पोलीस घटनास्थळी आले. आरोपी निघून गेले. सदर वाद घरजागेवररुन घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास फौजदार बामणे करीत आहेत.