महिलेला झोपेत तर तरुणाला पकडताना घेतला सापानं चावा; काळजी घेण्याचं सर्पमित्रांचं आवाहन

By विलास जळकोटकर | Published: July 10, 2023 05:50 PM2023-07-10T17:50:27+5:302023-07-10T17:50:42+5:30

पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सध्या सर्पदंशाचे प्रकार वाढले आहेत.

A woman was bitten by a snake while she was sleeping and a young man was caught Serpent friend's call for care | महिलेला झोपेत तर तरुणाला पकडताना घेतला सापानं चावा; काळजी घेण्याचं सर्पमित्रांचं आवाहन

महिलेला झोपेत तर तरुणाला पकडताना घेतला सापानं चावा; काळजी घेण्याचं सर्पमित्रांचं आवाहन

googlenewsNext

सोलापूर: पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सध्या सर्पदंशाचे प्रकार वाढले आहेत. शेळगीमध्ये एका महिलेला झोपेत असतानाच सापानं चावा घेतला तर दोड्डी गावामध्ये साप पकडत असताना तरुणाला दंश केला. दोघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आजूबाजूला अडगळीचे साहित्य ठेऊ नका, रात्रीच्यावेळी बॅटरीचा वापर करा. पायात बूट वापरावेत, असा सल्ला सर्पमित्रांनी दिला आहे.

यातील पहिली घटना शेळगी येथी साई पार्क येथे घडली. पार्वती जगदेवप्पा पुजारी (वय- ४५, रा. ) या झोपलेल्या असताना सापानं चावा घेतला. रविवारी सायंकाळी ५ च्या सुमारास ही घटना घडली. मुलगा सिद्धाराम याने त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

दुसरी घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी या गावात घडली. येथे नागेश बाळू साखरे (वय- २८, रा. मुळेगाव) हा तरुण साप पकडत असताना त्याला चावा घेतला. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. दोन्ही घटनेतील दोघांवरही शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सिव्हील चौकीत याची नोंद करण्यात आली आहे.
 

Web Title: A woman was bitten by a snake while she was sleeping and a young man was caught Serpent friend's call for care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.