कोर्ट वॉरंटच्या भितीने दरवाज्याला गळफास घेऊन तरूणाची आत्महत्या
By रूपेश हेळवे | Updated: April 30, 2023 17:55 IST2023-04-30T17:54:29+5:302023-04-30T17:55:30+5:30
ही घटना जुना विडी घरकुल येथे घडली.

कोर्ट वॉरंटच्या भितीने दरवाज्याला गळफास घेऊन तरूणाची आत्महत्या
सोलापूर : कोर्ट वाॅरंटच्या भितीने ३५ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना जुना विडी घरकुल येथे घडली. गौस हबीब रहेमान शेख (वय ३५, रा. जुना विडी घरकुल) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.
मयत गौस हबीब शेख यांचे कौटुंबिक न्यायालयामध्ये केस चालू आहे. त्यांनी वाॅरंटच्या भितीने शनिवारी राहत्या घरात घराच्या दरवाज्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत शनिवारी सायंकाळी मिळून आला. त्यास खाली उतरवून नातेवाईकांनी बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच नातेवाईकांनी हॉस्पिटल परिसरात मोठी गर्दी केली होती.