सोशल मीडियावर 'आम्ही जातो आमच्या गावा' म्हणत तरुणाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 12:07 PM2022-10-29T12:07:30+5:302022-10-29T12:08:50+5:30

गावावर शोककळा : नंदेश्वरमध्ये सलग तीन दिवस तिघांचा मृत्यू

A young man committed suicide by saying by posting msg on social media | सोशल मीडियावर 'आम्ही जातो आमच्या गावा' म्हणत तरुणाची आत्महत्या

सोशल मीडियावर 'आम्ही जातो आमच्या गावा' म्हणत तरुणाची आत्महत्या

Next

मंगळवेढा : नंदेश्वर येथे एका २५ वर्षीय तरुणाने सोशल मीडियावर बाय बाय.... आम्ही जातो आमच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा असा संदेश सर्वांना पाठवून राहत्या घरी पत्र्याच्या अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली. या घटनेची पोलिसांत अकस्मात मयत अशी नोंद झाली आहे. दरम्यान, नंदेश्वर गावात सलग तीन दिवस एकाचा खून आणि दोघांची आत्महत्या झाल्याने गावावर शोककळा पसरली अन् गाव ऐन दिवाळीच्या सणात चर्चेत आले आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत रमेश गजानन चौगुले (वय २५) हे नंदेश्वर येथे एकटे रहावयास असून, ते दूध डेअरीमध्ये कामास होते. त्याचे वडील मयत झाले असून, त्याची आई ही परगावी उदगाव (ता. शिरोळ) येथे राहते. रमेश यांनी २६ ऑक्टोबर रोजी सायं. ५.३० पूर्वी घरातील पत्र्याच्या अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याची खबर नंदेश्वर गावचे पोलीस पाटील संजय रंडे यांनी दिली.

दरम्यान, २३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजता जमीन नावावर करण्यासाठी अंगठा न दिल्याने ४७ वर्षांच्या महिलेच्या खुनाची घटना घडली असताना दुसऱ्या दिवशी पुन्हा एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. एकाच गावात सलग तीन दिवस ऐन दिवाळी सणात मृत्यू झाल्याने सर्वत्र या घटनेची चर्चा होत होती.

Web Title: A young man committed suicide by saying by posting msg on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.