यात्रेसाठी दुचाकीवरून गावी जाताना अपघातात तरुणाचा मृत्यू
By रूपेश हेळवे | Updated: December 1, 2022 14:05 IST2022-12-01T14:05:04+5:302022-12-01T14:05:50+5:30
मयत विजय निलंगे हा मुंबई येथे एका लाकडी वस्तू बनवण्याच्या कारखान्यात कामाला होता. तो मुळ नागणसूरचा होता.

यात्रेसाठी दुचाकीवरून गावी जाताना अपघातात तरुणाचा मृत्यू
सोलापूर : यात्रेसाठी गावी जाताना केगाव जवळ दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील एका तरूणाचा मृत्यू झाला. तर दुसरा जखमी झाला आहे. विजय खाजप्पा निलंगे ( वय २०,रा. नागणसूर, अक्कलकोट) असे मयत तरुणाचे नाव आहे. तर संजीवकुमार बसलिंगप्पा मुदीनकेरी ( रा. नागणसूर, अक्कलकोट ) हा तरुण जखमी झाला आहे.
मयत विजय निलंगे हा मुंबई येथे एका लाकडी वस्तू बनवण्याच्या कारखान्यात कामाला होता. तो मुळ नागणसूरचा होता. त्या गावाची यात्रा असल्याने तो मुंबईहून मित्रासोबत सोलापूर मार्गे नागणसूरला जात होता. गुरूवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्याच्या वाहनाचा अपघात झाला. त्याला इतर मित्रांनी उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. दरम्यान डॉक्टरांनी विजय याला मृत घोषित केले तर संजीवकुमार याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.