मंगळवेढा बायपास रोडवर वाहनानं तरुणाला उडवलं...
By रवींद्र देशमुख | Published: July 17, 2023 07:45 PM2023-07-17T19:45:30+5:302023-07-17T19:46:11+5:30
बेशुद्धावस्थेत तरूणाला सोलापूरला हलवलं, उपचार सुरु
रवींद्र देशमुख, सोलापूर: मंगळवेढा बायपास रोडवर सुसाट वेगानं धावणाऱ्या एका अज्ञात वाहनानं जोरदार धडक देऊन वाहन नाहीसं झालं. रस्त्यावर पडलेला तरुणाच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो बेशुद्ध पडला. सोमवारी सकाळी ७:३० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. दशरथ रामा शेंडे (वय- ३०, रा. नागणेवाडी, ता. मंगळवेढा) असे बेशुद्धावस्थेतील तरुणाचे नाव आहे.
जखमी तरुणाला पोलिसांनी तातडीने मंगळवेढा सरकारी दवाखान्यात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करुन सोमवारी सकाळी ११:३० च्या सुमारास भाऊजी पंडित क्षीरसागर याने बेशुद्धावस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.