तरुणाचा १५ वर्षे मोठी असलेल्या शेजारणीवर डोळा; पाठलाग करुनही ऐकेना, मग...
By विलास जळकोटकर | Published: March 20, 2023 04:28 PM2023-03-20T16:28:14+5:302023-03-20T16:28:36+5:30
असभ्य वर्तन : पिडितेनं ठोकली थेट ठाण्यात केस
विलास जळकोटकर/ सोलापूर
सोलापूर : वयानं १५ वर्षानं मोठी असलेल्या शेजारणीवर डोळा ठेऊन तिच्या असभ्य वर्तन करणाऱ्या तरुणाविरुद्ध पोलिसात पिडित महिलेल्या तक्रारीवरुन सोमवारी दुपारी गुन्हा नोंदला गेला. ही घटना रविवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली.
पिडित महिलेलने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शहरातील एका भागामध्ये पिडिता आपल्या पतीसमवेत राहते. तिला तीन मुली व एक मुलगा आहे. यातील दोन मुलींचे लग्न झाले आहे. अन्य एक मुलगा व मुलगी कामानिमित्त पुण्याला गेले होते. पती मजुरीचे काम करतात. शेजारी राहणारा तरुण १४ मार्चपासून घरी कोणी नसताना मोबाईलवरुन फोन करुन ‘तू मला आवडते, माझ्या सोबत ये’ म्हणून जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता.
रविवारी (१९ मार्च) रोजी सकाळी ११ च्या सुमारास जिल्हा परिषदेकडे कामानिमित्त गेले असता तोही मागे आला. येथेही लगट करण्याचा प्रयत्न केला. त्याला तुझे वय काय आहे असे करु नको म्हणूनही त्याचे वर्तन सुधारले नाही. पतीला सर्व सांगून अखेर पिडितेने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा नोंदला आहे.
पाच दिवसांपासून देत होता त्रास
मुलं, पती घरी नसल्याची संधी साधून संबंधीत तरुण मोबाईल करुन सातत्याने त्रास देत होता. त्याला समजावून सांगूनही तो ऐकत नव्हता. पिडितेपेक्षा १५ वर्षांनी लहान असूनही त्याचे असभ्य वर्तन सहन न झाल्याने पिडितेला पोलिसात धाव घ्यावी लागल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.