युवा कवीची बाईकचोरी..चोरांसाठी कविता.. कधी दिसली तर माझ्याकडं वळून बघू द्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 17:01 IST2025-03-19T17:00:44+5:302025-03-19T17:01:28+5:30

सोशल मीडियावर भावना व्यक्त : सव्हिंसिंग राहून गेलं

A young poet's bike theft a poem for thieves if you ever see it, please come back to me and see it | युवा कवीची बाईकचोरी..चोरांसाठी कविता.. कधी दिसली तर माझ्याकडं वळून बघू द्या!

युवा कवीची बाईकचोरी..चोरांसाठी कविता.. कधी दिसली तर माझ्याकडं वळून बघू द्या!

सोलापूर : एखाद्याला एखादी वस्तू क्षुल्लक वाटत असते, तर एखाद्याच्या आयुष्यात त्या वस्तूची किंमत ही जिवापेक्षा जास्त असते. शहाजी कांबळे या तरुणाच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाची असलेली त्याची दुचाकी चोरीला गेली. आधीच आर्थिक संकटात असलेल्या या हळव्या तरुणाने चोराला शिव्या न देता, गाडीला जास्त त्रास देऊ नको, कधी रस्त्यात दिसली, तर एकदा माझ्याकडे वळून बघू दे, अशी विनंती सोशल मीडियावर केली.

शहाजी कांबळे हा तरुण सलगर वस्ती येथे राहतो. २०१२ मध्ये त्याने दुचाकी सेकंड हँड घेतली होती. ८ मार्च रोजी रात्री तो काळजापूर मारुती येथे पत्नीसह दर्शनासाठी आला होता. दर्शन झाल्यानंतर बाहेर आला, पाहतो तर काय? दुचाकी चोरीला गेली. कुणीतरी चुकून नेली असेल, असे वाटले. म्हणून, वाट पाहिली. पण, गाडी परत घेऊन कुणी आले नाही.

वाट पाहून शेवटी त्यांनी घरी जाण्याचा निर्णय घेतला. पण, खिशात फक्त ५० रुपये असल्याने रिक्षा करता येणे शक्य नव्हते. म्हणून, आईसक्रीम खात काळजापूर मारुती मंदिर ते सलगर वस्तीपर्यंत चालत गेले.

तिने माफ करावं

माझ्याकडून तिची सेवा झाली नाही, तिने मला माफ करावं. चोरट्याला विनंती आहे की, तिला जास्त त्रास देऊ नये. ती खूप प्रामाणिक आहे. तिची काळजी घ्यावी. कधी मला ओळखलंच, तर तिला एकदा माझ्याकडे वळून बघू द्या. एकांतात केलेल्या प्रवासाची आठवण तिला होऊ द्या.

चोरीला गेलेल्या दुचाकीने अनेक अडचणीत साथ दिली होती. आता ती नसल्यामुळे खूप त्रास होत आहे. अजून तरी पोलिसात तक्रार दिली नाही. मी शासकीय तंत्रनिकेतन येथे कंत्राटी पद्धतीने कामाला असून, रोज रिक्षाने येण्या-जाण्यासाठी २०० रुपयांचा खर्च होत आहे.

शहाजी कांबळे, तरुण कवी

या शब्दात मांडल्या भावना

गाडी गेली याचं दुःख नाही, पण गाडीने माझ्यासोबत लय दुःख भोगलं. माझ्या सर्व दुःखात तिने खांद्याला खांदा लावून साथ दिली. कधी धोका नाही दिला. कधी ऐनवेळी पंक्चर झाली नाही. माझ्याकडून सव्र्व्हिसिंग करायची राहून गेली. प्रत्येकवेळी म्हणणार पगार झाल्यावर करू, पुढच्या पगारीला करू, पण तिची सेवा करायची संधी मिळाली नाही. तिने खूप समजून घेतलं मला, माझ्या परिस्थितीला. मी कुठं जाऊन फिरत होतो. कुठं जाऊन रडत होतो, कुणासाठी रडत होतो, तिला सगळं माहीत आहे. पण, ती बोलली नाही.

Web Title: A young poet's bike theft a poem for thieves if you ever see it, please come back to me and see it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.