सोलापुरात रात्रीच्या पावसामुळे नाल्यात वाहून गेल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2023 12:58 PM2023-11-29T12:58:45+5:302023-11-29T12:59:37+5:30

जोडभावी पेठ परिसरातील धक्कादायक घटना घडली.

A youth died in Solapur after being swept away in a drain due to rain. | सोलापुरात रात्रीच्या पावसामुळे नाल्यात वाहून गेल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू

सोलापुरात रात्रीच्या पावसामुळे नाल्यात वाहून गेल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू

सोलापूर : सोलापूरात मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्यात वाहून गेल्याने एका तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. जोडभावी पेठ परिसरातील धक्कादायक घटना घडली. सलाम  दलाल असे ३५ वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे. मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास मुसळधार पावसात घरी परत येत असताना कुंभार वेस परिसरातील नाल्याजवळ गाडी घसरल्याने मृत तरुण कोसळला. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने प्रवाहासोबत तो वाहून गेला आणि त्यातच त्याचा मृत्यू झालंय.

मृत सलाम दलाल याला एकूण 3 मुलं असून अवघ्या ३ महिन्याचा बाळ आहे, तर 5 आणि ३ वर्षाचे दोन मुलं ही अनाथ झाली आहेत. मुंबईत झालेल्या २६6/११च्या वेळेस वडील साबीर दलाल यांना गोळी लागल्याने जखमी झाले होते, काही महिन्यापूर्वी त्यांचा ही मृत्यू झाला होता. आता कुटुंबातील कर्ता असलेल्या सलाम याचा ही मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातं आहे.

Web Title: A youth died in Solapur after being swept away in a drain due to rain.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.