रोडवर थांबलेल्या ट्रकला अवजड वाहनानं ठोकल्यानं मध्यप्रदेशातील तरुण जखमी

By शीतलकुमार कांबळे | Published: July 3, 2024 06:43 PM2024-07-03T18:43:44+5:302024-07-03T18:45:44+5:30

सोलापूर : रोडच्या बाजूला थांबलेल्या ट्रकला १२ टार अवजड वाहनाने पाठिमागून ठोकल्यानं एका तरुणास गंभीर जखमी व्हावे लागले. बुधवारच्या ...

A youth in Madhya Pradesh was injured after a heavy vehicle hit a truck stopped on the road | रोडवर थांबलेल्या ट्रकला अवजड वाहनानं ठोकल्यानं मध्यप्रदेशातील तरुण जखमी

रोडवर थांबलेल्या ट्रकला अवजड वाहनानं ठोकल्यानं मध्यप्रदेशातील तरुण जखमी

सोलापूर : रोडच्या बाजूला थांबलेल्या ट्रकला १२ टार अवजड वाहनाने पाठिमागून ठोकल्यानं एका तरुणास गंभीर जखमी व्हावे लागले. बुधवारच्या पहाटे नंदूर-भाटेवाडी रोडवर ही घटना घडली. संजय गुलाब पवार (वय- २०, रा. निमुदी, इंदौर, मध्यप्रदेश) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

यातील जखमी तरुण हा १२ टायर चाके असलेलेले वाहन चालवत होता. नंदूर-भाटेवाडी रोडच्या बाजूला एक ट्रक थांबलेला होता. पाठिमागून अवजड वाहनानं धडक दिल्याने संबंधीत तरुण जखमी झाला. त्याच्या डोक्याला, पायास जखम झाली. त्रास होत असल्याने बुधवारी सकाळी ९:२० च्या सुमारास त्याला येथील शासकीय रुग्णालयात नांदणी टोलनाक्याजवळील रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरु असून, तो शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
 

Web Title: A youth in Madhya Pradesh was injured after a heavy vehicle hit a truck stopped on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात