व्याजाचे पैसे न दिल्यावरुन तरुणाला जमावाकडून फायटरनं बेदम चोप; १० जणांवर सावकारी गुन्हा दाखल

By विलास जळकोटकर | Published: October 9, 2023 06:17 PM2023-10-09T18:17:48+5:302023-10-09T18:18:03+5:30

व्याजाची रक्कम न दिल्याच्या कारणावरुन चिडून दहाजणांनी मिळून तरुणाला फायटरने बेदम मारहाण करुन जखमी करण्याचा प्रकार शहरातील मड्डी वस्ती प्रियंका चौकात घडला.

A youth was beaten to death by a mob fighter for not paying interest Moneylending case registered against 10 persons | व्याजाचे पैसे न दिल्यावरुन तरुणाला जमावाकडून फायटरनं बेदम चोप; १० जणांवर सावकारी गुन्हा दाखल

व्याजाचे पैसे न दिल्यावरुन तरुणाला जमावाकडून फायटरनं बेदम चोप; १० जणांवर सावकारी गुन्हा दाखल

googlenewsNext

सोलापूर : व्याजाची रक्कम न दिल्याच्या कारणावरुन चिडून दहाजणांनी मिळून तरुणाला फायटरने बेदम मारहाण करुन जखमी करण्याचा प्रकार शहरातील मड्डी वस्ती प्रियंका चौकात घडला. यामध्ये मक्तूम बाशा जातकर (वय- २५, रा. मड्डी वस्ती, सोलापूर) हा गंभीर जखमी झाला. त्याने दिलेल्या तक्रारीवरुन जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात सावकारीचा गुन्हा नोंदला आहे.

विशाल कतारी, अजय कतारी, शंकर कतारी, संजय कतारी, विकास राजपूत, आर्य राजपूत, अर्जुन कतारी (सर्व रा. वीर तपस्वी शाळेसमोर, सोलापूर) व अन्य तिघे अशी गुन्हा नोंदलेल्यांची नावे आहेत.
फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी मक्तूम याने विशाल कतारी याच्याकडून तीन वर्षांपूर्वी १० हजार रुपये २० टक्के दराने घेतले होते. पैसे घेतानाच पहिल्या महिन्याचे २ हजार रुपये व्याज कमी करुन ८ हजार रुपये दिले होते. त्यानंतर एक वर्ष २ हजार रुपये असे एकूण २४ हजार रुपये फिर्यादीने व्याजापोटी दिले.

एकेदिवशी त्याने फिर्यादीच्या चुलतभावाला पैसे घेतल्याबद्दल कल्पना दिली. त्याने ४ हजार रुपये मुद्दमालपोटी त्याला दिले. व फिर्यादीनेही २ हजार रुपये दिल्याने मुद्दलोटी केवळ ४ हजार रुपये देणे होते. सकाळी मडडी वस्ती येथील प्रियंका चौकात फिर्यादीला गाठून राहिलेले पैसे दे म्हणून फिर्यादीच्या खिशातील ३५० रुपये काढून घेतले. आणि त्याच्या वरील साथीदारांनी फायटरने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणी फिर्यादीवरुन वरील सर्वांविरुद्ध सावकारी अधिनियमान्वये गुन्हा नोंदला आहे.

Web Title: A youth was beaten to death by a mob fighter for not paying interest Moneylending case registered against 10 persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.