तरुणाच्या मानेवर अन पाठीवर कोयत्याने वार, सोलापुरात गुन्हा दाखल

By रवींद्र देशमुख | Published: November 25, 2023 04:42 PM2023-11-25T16:42:06+5:302023-11-25T16:43:04+5:30

बॉबी तळभंडारे याच्यासह अनोळखीविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.

A youth was stabbed on the neck and back with a coyta, a case was registered in Solapur | तरुणाच्या मानेवर अन पाठीवर कोयत्याने वार, सोलापुरात गुन्हा दाखल

तरुणाच्या मानेवर अन पाठीवर कोयत्याने वार, सोलापुरात गुन्हा दाखल

सोलापूर : काहीएक कारण न सांगता थेट मुलाच्या मानेवर व पाठीवर कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला चढवून गंभीर जखमी करण्याचा प्रकार सोलापुरातील एका कॉलेजजवळील कँटीनसमोर दुपारी २:१५ च्या सुमारास घडला. समर्थ संतोष गुरव असे जखमी मुलाचे नाव आहे. बॉबी तळभंडारे याच्यासह अनोळखीविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.

यातील मुलाची आई विद्या संतोष गुरव (वय- ३८, रा. भूषण नगर, रामवाडी, सोलापूर) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा मुलगा समर्थ याला वरील आरोपींनी दुपारी सव्वादोनच्या सुमारास शिवदारे कॉलेज लगत असलेल्या कॅन्टीसमोर कोयत्याने मानेवर व पाठीवर वार करून जखमी केले. पट्ट्याने, लाथाबुक्क्याने मारहाण केली. मारहाणीचे कारण सांगितले नाही. याप्रकरणी विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे, तपास फौजदार पोपळभट करीत आहेत.

Web Title: A youth was stabbed on the neck and back with a coyta, a case was registered in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.