अबब़़...तब्बल अडीच लाखांचा बैल, सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेतील जनावर बाजारात लाखोंची उलाढाल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 02:04 PM2018-01-17T14:04:19+5:302018-01-17T14:06:35+5:30

सोलापूर - विजापूर रस्त्यावरील रेवणसिद्धेश्वर मंदिराजवळ भरविण्यात आलेल्या जनावरांच्या बाजारात सुमारे २५ हजारांहून अधिक जनावरे दाखल झाली आहेत़ यात खिलार गाय-बैलांसह मुरा, खोंड, गीरगाय, गवळार जातीच्या व जाफराबादी म्हशींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

Aab ... ... two and a half million bulls, hundreds of millions of people turnover in Siddheshwar yatra in the cattle market! | अबब़़...तब्बल अडीच लाखांचा बैल, सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेतील जनावर बाजारात लाखोंची उलाढाल !

अबब़़...तब्बल अडीच लाखांचा बैल, सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेतील जनावर बाजारात लाखोंची उलाढाल !

googlenewsNext
ठळक मुद्दे सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वरांच्या यात्रेत होम मैदानावर कृषी प्रदर्शन जनावर बाजारात मंदिर समितीच्यावतीने शेतकºयांसाठी विविध सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत़यंदा खिलार बैल व जाफराबादी म्हशीला चांगली मागणी आहे़ या दोघांच्या किमती जास्त आहेत़


लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त सिद्धेश्वर देवस्थान समितीच्या वतीने सोलापूर - विजापूर रस्त्यावरील रेवणसिद्धेश्वर मंदिराजवळ भरविण्यात आलेल्या जनावरांच्या बाजारात सुमारे २५ हजारांहून अधिक जनावरे दाखल झाली आहेत़ यात खिलार गाय-बैलांसह मुरा, खोंड, गीरगाय, गवळार जातीच्या व जाफराबादी म्हशींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या बाजारात लाखोंची उलाढाल होत असून, ही उलाढाल आणखी वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. या बाजारात अडीच लाखांच्या खिलार बैलाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे़ 
 सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वरांच्या यात्रेत होम मैदानावर कृषी प्रदर्शन भरविले जाते़ या प्रदर्शनात शेतीचे उत्पादन वाढविण्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचे विविध साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे़ याशिवाय यात्रेनिमित्त रेवणसिध्देश्वर मंदिराजवळील १० ते २० एकरात जनावरांचा बाजार भरविण्यात आलेला आहे़ या बाजारास १० जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे़ मागील वर्षापेक्षा यंदाच्या जनावरांच्या बाजारास नागरिक, शेतकºयांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, यंदाचा जनावरांचा बाजार हाऊसफुल्ल झाला आहे. या बाजारात १० हजारांपासून ते अडीच ते चार लाखांपर्यंतची जनावरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत़ मागील वर्षीपेक्षा यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे़ या पावसामुळे चाºयाचा प्रश्न मिटला आहे़ यामुळे दूध देणाºया म्हशी, गायी विक्रीचे प्रमाण कमी आहे़ मात्र ज्या गायी, म्हशी बाजारात दाखल झालेल्या आहेत त्यांच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत़ एक म्हैस १५ हजारांपासून ते ५० हजारांपर्यंत विक्री होत आहे़
 हा बाजार रेवणसिध्देश्वर मंदिर परिसर ते मोदीच्या रेल्वे बोगद्यापर्यंत भरलेला आहे. कर्नाटक, मराठवाडा, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तसेच विविध भागातील शेतकरी वर्ग जनावरे विक्रीस आणली आहेत. यंदाच्या जनावरांच्या बाजारात विविध प्रकारचे बैल, खोंड, गाय, जर्सी गाय, तांबड्या रंगाची गीर गाय, म्हशीमध्ये-पंढरपुरी म्हशी, गेरू, जाफराबादी म्हैस ही साधारतण :  १२ लिटर दूध देते़ या म्हशीची अंदाजे किंमत २५ हजारांपासून ते ७५ हजारांपर्यंत आहे़ जाफराबादी म्हशीला बाजारात मागणी फार आहे तसेच विविध प्रकारची जनावरे विक्रीस आली आहेत़
 जनावरांच्या बाजारात जनावरास काय इजा झाल्यास दवाखान्याची सोय आहे. त्याचबरोबर आलेल्या शेतकºयांसाठी चहापाणीसाठी हॉटेल, फळविक्रेते आणि खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल याठिकाणी आहेत़ जनावरांसाठी पाण्याबरोबर चाºयाची व्यवस्थादेखील करण्यात आलेली आहे़ सकाळी सहापासून ते रात्री उशिरापर्यंत जनावरांचा बाजार सुरूच असतो. याठिकाणी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. 
--------------------
या बैलाने वेधले सर्वांचेच लक्ष
- सिध्देश्वर यात्रेनिमित्त रेवणसिध्देश्वर मंदिराजवळ भरविण्यात आलेल्या बाजारात तब्बल अडीच लाखांच्या बैलाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे़ कारंबा (ता़ उ़ सोलापूर) येथील शेतकरी नागनाथ बन्ने यांच्या मालकीचा हा बैल आहे़ या बैलाचे खास वैशिष्ट्य म्हणजे दिसायला मोठा दिमाखदार, देवाचे मंदिर पाहिले की खाली झुकून पाया पडणारा आहे़ या बाजारात हलगीच्या तालावर या बैलाने पाया पडतानाचे चित्र अनेक शेतकºयांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आहे़ शिवाय सोशल मीडियावरही या बैलाने चांगलीच क्रेझ निर्माण केली आहे़ या बैलासमवेत शेतकरी नागनाथ बन्ने, संजय गायकवाड, दत्तोबा गुंड, तम्मा बर्हिजे, शेतकरी आदी उपस्थित होते़ 
------------------
यंदाच्या जनावर बाजारात मागील वर्षीपेक्षा जास्त जनावरे दाखल झाली आहेत़ यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने शेतीच्या उत्पादनात वाढ होत आहे़ बाजारात विविध जातीचे बैल, म्हशी दाखल झाल्या आहेत़ १० हजारांपासून ते चार लाखांपर्यंतची जनावरे बाजारात विक्रीसाठी आली आहेत़
- आप्पासाहेब दत्तोबा गुंड, शेतकरी, उत्तर सोलापूर
यंदा रेवणसिध्देश्वर मंदिरासमोर भरविण्यात आलेल्या जनावर बाजारात मंदिर समितीच्यावतीने शेतकºयांसाठी विविध सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत़ बैल, खोंड, गाय, जर्सी गाय, तांबड्या रंगाची गीर गाय आदी प्रकारची जनावरे विक्रीसाठी दाखल झालेली आहेत़ यंदा खिलार बैल व जाफराबादी म्हशीला चांगली मागणी आहे़ या दोघांच्या किमती जास्त आहेत़
- समाधान सूर्यभान गायकवाड, शेतकरी, सोलापूर

Web Title: Aab ... ... two and a half million bulls, hundreds of millions of people turnover in Siddheshwar yatra in the cattle market!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.