दररोज फळांची आरास अन् कोरोना योद्ध्यांच्या हस्ते आरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:27 AM2021-09-17T04:27:31+5:302021-09-17T04:27:31+5:30

बार्शी : शहरातील मध्यवर्ती भागात गणेश रोड गणेश तरुण मंडळ यांनी साध्या पद्धतीने गणेशाची स्थापना केली आहे. या उत्सव ...

Aarti at the hands of Uncorona warriors every day | दररोज फळांची आरास अन् कोरोना योद्ध्यांच्या हस्ते आरती

दररोज फळांची आरास अन् कोरोना योद्ध्यांच्या हस्ते आरती

Next

बार्शी : शहरातील मध्यवर्ती भागात गणेश रोड गणेश तरुण मंडळ यांनी साध्या पद्धतीने गणेशाची स्थापना केली आहे. या उत्सव काळात दररोज वेगवेगळ्या फळांनी श्रींची आरास केली जात आहे. तसेच कोरोना काळात ज्यांनी प्रत्यक्षरित्या रुग्ण सेवा केली अशा योद्ध्यांच्या हस्ते गणेशाची आरती करुन त्यांना गौरविले जात आहे.

त्यामध्ये शासकीय व खासगी रुग्णांलयातील डॉक्टर, परिचारिका, अंगणवाडी सेविका, पत्रकार, आशा वर्कर, पोलीस, आरोग्य व स्वच्छता कर्मचारी यांना श्री गणेशाच्या आरतीचा मान देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यंदा या मंडळाने ७१ वर्षे पूर्ण केले आहेत.

यापूर्वी मंडळाने धार्मिक, पौराणिक, सांस्कृतिक, समाज प्रबोधनात्मक देखावे सादर केले आहेत. गणेश उत्सवासाठी मंडळाचे संस्थापक महेश यादव व संतोष जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष अमोल हिंगमिरे, उपाध्यक्ष अमोल वायचळ, विनोद उमाटे, वीरेंद्र शिराळ, योगेश कारंजकर, अनिल मुलगे, प्रवीण गाढवे, संकेत ढोले, समर्थ बोटे, गणेश यादव, उमेश कारंजकर, सचिन वायचळ, नागेश खळदे, धनू लिगाडे, राहुल लिगाडे, सौरभ खळदे, सौरभ खळदे, हरिष वायचळ, रामभाऊ डोंबे, रामचंद्र घोंगडे, श्रीकांत सुपेकर, विजय वाघमारे हे परिश्रम घेत आहेत.

150921\5957img-20210914-wa0049.jpg

गणेश रोड गणपती

Web Title: Aarti at the hands of Uncorona warriors every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.