अबब... सोलापूरचा कोरोना मृत्यूदर १०.०९ टक्के; ४६ दिवसांत ६३ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 12:14 PM2020-05-27T12:14:48+5:302020-05-27T12:17:53+5:30
राज्यात सर्वाधिक : पहिल्या क्रमांकावरील जळगावचा ११.५३ टक्के तर अमरावती तिसºया स्थानी
महेश कुलकर्णी
सोलापूर : कोरोनाने महाराष्टÑातील सर्वच भागात हातपाय पसरलेले आहेत. गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोनाचा प्रसार होत असला तरी मृत्यूदर हा साधारण २ ते ३ टक्क्यांपर्यंत असेल, असे जगभरातील तज्ज्ञ सांगत असले तरी महाराष्टÑातील जळगाव आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांचा मृत्यूदर अनुक्रमे ११.५३% आणि १०.०९% झालेला आहे.
जळगाव हा महाराष्टÑातील सर्वाधिक मृत्यूदर असलेला जिल्हा ठरला आहे तर दुसºया क्रमांकावर सोलापूर आहे. याखालोखाल तिसरा क्रमांक अमरावतीचा आहे. अमरावती जिल्ह्यात मृत्यूदर ७.६९% इतका आहे.
महाराष्टÑात मुंबई, पुणे, औरंगाबाद, सोलापूर, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती ही शहरे रेड झोनमध्ये आहेत. या ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहेत. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे अधिक मृत्यू झाले आहेत तर सोलापूर शहरात हे प्रमाण अधिक आहे.
मृत्यूदर वाढण्याची चार प्रमुख कारणे...
- - कोरोनाची लक्षणे अनेक दिवस दिसल्यावरही तपासणी न करणे.
- - खासगी रुग्णालयात न मिळणारे उपचार
- - अपुरी वैद्यकीय सेवा.
- - केवळ सरकारी सेवेवर अवलंबून असणे आणि प्रशासनातील समन्वयाचा अभाव.
- - फिजिकल डिस्टन्स न पाळणे
जळगावमध्ये ५६ दिवसांत ५४; सोलापुरात ४६ दिवसांत ६३ मृत्यू
- जळगावमध्ये कोरोनाच्या ५६ दिवसांत कोरोनाचे ५४ मृत्यू झाले आहेत, तर सोलापुरात १२ एप्रिल रोजी पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला होता. तोही रुग्ण कोरोनाग्रस्त असल्याचे मृत्यूनंतरच कळले! सोलापुरात मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत असून, ४६ दिवसांत ५९ मृत्यू कोरोनाने झाले आहेत.
देशाचा २.९८% तर राज्याचा मृत्यूदर ३.२१%
- देशात कोरोनाचा मत्यूदर हा २.९८% इतका आहे. भारतात सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ महाराष्टÑात होत आहे. सध्या दर दिवशी तीन हजारांच्या आसपास नवे पॉझिटिव्ह रुग्ण राज्यात आढळत आहेत. राज्याचा मृत्यूदर ३.२१% एवढा आहे.
सोलापुरात मृत्यूनंतरच कळतो कोरोना !
- सोलापुरात कोरोनाच्या रुग्णांचा सतत वाढता आलेख आहे. एवढे होऊनही सोलापुरात कोरोना नेमका आला कसा ? हे कोडे प्रशासनाला अद्याप उलगडले नाही. एखाद्या आजारी व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समोर येते, असा गंमतीशीर पण तितकाच गंभीर प्रकार सोलापुरात सातत्याने दिसतो आहे.