अबब...जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्यासाठी हवे सव्वा चार लाख मास्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 10:49 AM2020-06-02T10:49:44+5:302020-06-02T10:51:22+5:30

जिल्हाधिकाºयांकडे मागणी; शिक्षण सभापतीची लिस्ट पाहून थक्क व्हाल

Abb ... Zilla Parishad schools need a quarter of a lakh masks | अबब...जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्यासाठी हवे सव्वा चार लाख मास्क

अबब...जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्यासाठी हवे सव्वा चार लाख मास्क

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठया प्रमाणावर वाढत आहेविषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासन विविध पातळीवर प्रयत्नराज्य शासनाने शाळा सुरू करण्याचे संकेत दिलेले आहेत

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्यासाठी साडेसात कोटी रुपये खर्चाचे ४  लाख ३५ हजार मास्कसह सात प्रकाराच्या साहित्यांची मागणी झेडपीचे शिक्षण सभापती दिलीप चव्हाण यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. 

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठया प्रमाणावर वाढत आहे. विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासन विविध पातळीवर प्रयत्न करीत आहे. राज्य शासनाने शाळा सुरू करण्याचे संकेत दिलेले आहेत. याप्रमाणे सन २०२०-२१ मधील शैक्षणिक वर्ष सुरू करायचे झाल्यास शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे.

जिल्हयात झेडपीच्या २८०० शाळा आहेत. या शाळांमधून २ लाख ७ हजार विद्यार्थी विद्यार्जन व ९ हजार ६४२ इतके शिक्षक त्यांच्यासाठी ज्ञानर्जनाचे काम करतात. त्याप्रमाणे या सर्वांच्या रक्षणासाठी जिल्हा नियोजनमधून खालील साहित्य खरेदी करून मिळावे. थ्री लेअर कापडी मास्क: ४ लाख ३५ हजार, फेस शील्ड कव्हर: २ लाख १७ हजार, डिजीटल थर्मल स्कॅनर: २८00, पल्स अ‍ॅक्सीमीटर: २८00, हॅन्ड सॅनीटायझर, पाच लिटरचे एक कॅन: २८00, फुट आॅपरेटेड हॅन्ड सॅनीटायझर: ५ हजार ६00. लिक्वीड हॅडवॉशसह डिस्प्रेशनर बॉटल: ५६00.

साडेसात कोटीचा खर्च
झेडपीच्या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी गरीब आहेत. त्यामुळे कोरोणापासून बचाव करणारे साहित्य घेण्याची त्यांची ऐपत नाही. त्यामुळे कोरोना विषाणू संसगार्पासुन त्यांचा बचाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ७ कोटी ५0 लाखाचा निधी द्यावा असा प्रस्ताव दिल्याचे शिक्षण सभापती दिलीप चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: Abb ... Zilla Parishad schools need a quarter of a lakh masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.