अबब..बार्शी तालुक्यात १२ तासात पडला तब्बल १४० मिमी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 12:18 PM2020-10-15T12:18:55+5:302020-10-15T12:21:23+5:30
पन्नास वर्षातील विक्रम मोडीत; शेतकºयांच्या शेतीपिकांचे नुकसान
बार्शी: बार्शी तालुक्यात गेल्या पन्नास वर्षात चोवीस तासात पडलेल्या पावसाचे सर्व विक्रम आजच्या पावसाने मोडीत काढले आहेत. बुधवारी पहाटे ३ ते दुपारी ३ या बारा तासात शहर व तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. तालुक्यातील दहाही महसुली मंडळात सरासरी दीडशे मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. तालुक्यात एकूण सरासरी १४०़४ मिमी एवढा पाऊस पडला आहे.
या पावसामुळे तालुक्यातील शेतकºयांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शहरात पडलेल्या पावसामुळे व्यापारी व नागरिकांचे देखील नुकसान झाले आहे. हा पाऊस एवढा भयावह होता की कोणालाच दिवसभर घराच्या बाहेर देखील पडता आले नाही. हा पाऊस सुरू असतानाच विविध ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले. बार्शी शहराचे हार्ट असलेल्या पांडे चौकात देखील तीन फूट पाणी साचले होते.
या भागात घुसले होते पाणी...
बार्शीत सलग दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे १४ आॅक्टोबर २०२० रोजी बार्शी शहरातील रामेश्वर झोपडपट्टी, सोलापूर रोड दोन्ही बाजूची काँक्रेट रस्त्याकडेची घरे, ४२२ बारंगुळे प्लॉट , एकविराई मंदिर परीसर ,बारंगुळे गल्ली भगवंत मैदान परिसर त्याचबरोबर मध्यवर्ती बाजारपेठ परिसरातील काही घरे दुकाने यासह विविध भागात पावसाचे गटारीतून लेंडीनाल्यातून वाहणारे पावसाचे पाणी जाऊन लोकांची अपरिमित हानी झालेली आहे. दैनंदिन गृहोपयोगी वस्तु तसेच घरे दुकाने यातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ नगरपरिषदेच्या शॉपिंग सेंटर तळमजल्यावर असणारी सर्व दुकाने पाण्याखाली आली आहेत़ चौधरी नामक व्यक्ती तुळजापूर रोड नाल्या त वाहुन गेलेला आहे आगळगाव रोड वस्ताद हॉटेल ओढ्याच्या पाण्याच्या प्रवहामुळे डिव्हायडर अंगावर पडून शिवशंकर नामक सायकलस्वार गंभीर जखमी झालेला आहे़ अलीपुर रोड परिसरात घरांची पडझड झालेली आहे .तसेच सोमवार पेठ भागात काही दुकान आणि घरांची पडझड झालेली आहे़ ऐनापूर रोड टाकणखार रोड भागातील व्यापारी गोदामे आणि दुकानात पाणी घुसले आहे त्यामूळे मोट्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
----------
बार्शी तालुका मंडळ निहाय पडलेला पाऊस
- बार्शी- 158
- अगळगाव- 65
- वैराग- 168
- पानगाव- 165
- सुर्डी- 149
- गौडगाव- 155
- पांगरी- 122
- नारी- 160
- उपळे दु.- 110
- खांडवी- 152
- एकुण पाऊस - 1404 मि. मि.
- सरासरी पाऊस - 140.4 मि. मि.