अल्पवयीन मुलीचं अपहरण; आईची पोलिस ठाण्यात धाव
By विलास जळकोटकर | Published: March 17, 2024 07:16 PM2024-03-17T19:16:19+5:302024-03-17T19:16:23+5:30
फिर्यादीचे गाऱ्हाणे ऐकून घेतले. या प्रकरणाचा तपास हवालदार वाल्मीकी करीत आहेत.
सोलापूर: राहत्या घरी असलेल्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून तिचे अपहरण केल्याची तक्रार तिच्या आईने सलगर वस्ती पोलिस ठाण्यात केली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास थोबडे वस्ती देगाव नाका येथे घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादीची मुलगी ही शुक्रवारी नेहमीप्रमाणे घरात असताना फिर्यादीच्या नकळत कोणीतरी तिला फूस लावून पळवून नेले. यानंतर फिर्यादीने आजूबाजूला, नातलगांकडे चौकशी करूनही ती मिळून आली नाही.
अखेर त्यांनी सलगर वस्ती पोलिस ठाणे गाठून आपल्या मुलीचे अपहरण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. तक्रार नोंदवताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमाकांत शिंदे यांच्यासह फौजदार बनकर, हवालदार उपासे यांनी भेट दिली. फिर्यादीचे गाऱ्हाणे ऐकून घेतले. या प्रकरणाचा तपास हवालदार वाल्मीकी करीत आहेत.