देशात पहिला ऑक्सिजन प्रकल्प उभारणारे अभिजित पाटील यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:23 AM2021-05-21T04:23:15+5:302021-05-21T04:23:15+5:30

पंढरपूर : काेरोना काळात रुग्णांना ऑक्सिजन कमी पडत असताना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी महाराष्ट्रातील सर्व साखर ...

Abhijit Patil felicitated for setting up first oxygen project in the country | देशात पहिला ऑक्सिजन प्रकल्प उभारणारे अभिजित पाटील यांचा सत्कार

देशात पहिला ऑक्सिजन प्रकल्प उभारणारे अभिजित पाटील यांचा सत्कार

Next

पंढरपूर : काेरोना काळात रुग्णांना ऑक्सिजन कमी पडत असताना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्माण करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी स्वत:च्या कारखान्यावर प्रकल्प उभा केला. यानिमित्ताने पाटील यांचा चळेगावचे माजी तंटामुक्तीचे अध्यक्ष उमेश मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्यासह अनेक मान्यवरच्या व्हर्च्युअलपणे उद्घाटन झाले. चळेगावचे माजी तंटामुक्तीचे अध्यक्ष उमेश मोरे, सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष गणेश ननवरे, होळे गावचे योगेश होळकर यांनी धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांचा सत्कार केला.

यावेळी कारखान्याचे संचालक भागवत चौगुले, संदीप खारे, सुरेश सावंत, संजय खरात, दीपक आदमिले उपस्थित होते. (वा. प्र.)

---

१९ अभिजीत पाटील

देशात पहिला ऑक्सिजन प्रकल्प उभारणारे अभिजित पाटील यांचा सत्कार करताना उमेश मोरे, संचालक भागवत चौगुले, संदीप खारे, सुरेश सावंत, संजय खरात, दीपक आदमिले.

Web Title: Abhijit Patil felicitated for setting up first oxygen project in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.