पूरग्रस्तांना अभिजित पाटील यांचा मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:27 AM2021-08-20T04:27:24+5:302021-08-20T04:27:24+5:30

गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात पावसाने थैमान घातल्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाल्याने हजारो लोकांची घरे पाण्याखाली गेली, शेकडो ...

Abhijit Patil's helping hand to flood victims | पूरग्रस्तांना अभिजित पाटील यांचा मदतीचा हात

पूरग्रस्तांना अभिजित पाटील यांचा मदतीचा हात

Next

गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात पावसाने थैमान घातल्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाल्याने हजारो लोकांची घरे पाण्याखाली गेली, शेकडो जनावरे वाहून गेली आणि वेगवेगळ्या ठिकाणी दरडी कोसळून अनेकांचा बळी गेला आहे. या संकटाच्या प्रसंगात या पूरग्रस्तांना "एक हात मदतीचा" देऊन त्यांना धीर देणे आणि त्यांचे उद्ध्वस्त झालेले संसार पुन्हा उभे करणे ही जबाबदारी म्हणून अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम राबविण्यात आला.

या कीटमध्ये गहू, साखर, तांदूळ, डाळ, तेल, रवा, मसाला, तिखट, मीठ बॉटल, चहा पावडर, बिस्किट पुडे, ब्रश, कोलगेट, साबण, मेणबत्ती यांसह २१ जीवनावश्यक वस्तूंचे कीट सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात बाजे, मिरगाव, गोकुळ, ढोकावळे, तर रायगड जिल्ह्यातील असनपोई, बौद्धवाडी, बिरवडी, भोरप या पूरग्रस्त गावांतील नागरिकांना देण्यासाठी अभिजित आबा पाटील फाैंडेशनचे सहकारी रवाना झाले आहेत.

फोटो :

पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी मदत पाठवताना धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील व अन्य.

Web Title: Abhijit Patil's helping hand to flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.