अभिजीत पाटील यांच्या एकाच वेळी तीन साखर करखान्यांवर आयकर विभागाच्या धाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2022 02:15 PM2022-08-25T14:15:25+5:302022-08-25T14:15:32+5:30
पंढरपूर : सर्वसामान्य तरुण ते साखर सम्राट असा प्रवास अल्पावधीत करणारे डीव्हीपी उद्योग समूहाचे प्रमुख श्री विठ्ठल सहकारी साखर ...
पंढरपूर : सर्वसामान्य तरुण ते साखर सम्राट असा प्रवास अल्पावधीत करणारे डीव्हीपी उद्योग समूहाचे प्रमुख श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या तीन कारखान्यांवर, पंढरपूर मधील कार्यालयात व निवासस्थानी आयकर विभागाच्या पथकाने तपासणी सुरू केली आहे.
पंढरपूर येथील पाटील यांच्यावर आयकर विभागाच्या धाड सत्र सुरू झाल्याचे बातमीने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पाटील यांनी काही वर्षात राज्यात ४ खाजगी कारखाने विकत घेतले होते. अल्पावधीत साखर उद्योगातील ही प्रगती पाहून याबाबत कायमच उलट सुलट चर्चा सुरू होती . अशातच या उद्योजकाने सोलापूर जिल्ह्यातील २० वर्षांपासून बंद पडलेला कारखाना चालवायला घेऊन तो गेल्यावर्षी यशस्वीपणे चालवून दाखवला होता. त्यानंतर पंढरपूर मधील एक बड्या कारखान्याची निवडणूक लढवून तो जिंकल्याने ते पुन्हा चर्चेत आला होता.
तीन साखर कारखान्यामध्ये, पंढरपूर मधील कार्यालयात व निवासस्थानी आयकर विभागाच्या पथकाने तपासणी सुरू केली आहे. कार्यालयाच्या बाहेर व निवासस्थानाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. आता या धाड सत्रात आयकर विभागाला नेमके काय हाती लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
------------
या ठिकाणी धाडी....
धाराशिव साखर कारखाना , चोराखडी , उस्मानाबाद धाराशिव साखर कारखाना , युनिट २ , लोहा नांदेड, वसंतदादा साखर कारखाना विठेवाडी , चांदवड नाशिक या तीन खाजगी साखर कारखान्यावर व पंढरपुरातील डीव्हीपी समूहाचे कार्यालय, त्यांच्या निवासस्थानी धाडी सुरू आहेत.