दिवाळीतील अभ्यंगस्नान...पवित्र अन् आरोग्यदायी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 04:29 PM2018-11-01T16:29:41+5:302018-11-01T16:34:49+5:30

रवींद्र देशमुख सोलापूर : भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण आणि साजरा करण्याच्या पध्दती या शास्त्र, विज्ञानाशी निगडीत आहे. अमूक सणादिवशी ...

Abhyangananan of Diwali ... holy and healthy! | दिवाळीतील अभ्यंगस्नान...पवित्र अन् आरोग्यदायी !

दिवाळीतील अभ्यंगस्नान...पवित्र अन् आरोग्यदायी !

googlenewsNext
ठळक मुद्देभारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण आणि साजरा करण्याच्या पध्दती या शास्त्र, विज्ञानाशी निगडीतदिवाळीच्या नरक चतुदर्शीच्या दिवशी अभ्यंगस्नान करायला आपल्या शास्त्राने सांगितले

रवींद्र देशमुख

सोलापूर : भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण आणि साजरा करण्याच्या पध्दती या शास्त्र, विज्ञानाशी निगडीत आहे. अमूक सणादिवशी हे करा, ते करू नका, हे आग्रहपूर्वक सांगण केवळ सर्वंकष मानवी हितासाठीच असतं. आता पाहा ना, दिवाळीच्या नरक चतुदर्शीच्या दिवशी अभ्यंगस्नान करायला आपल्या शास्त्राने सांगितले आहे. ते का? तर सकाळी सूर्योदयाच्या आधी झोपेतून उठणे आणि वातावरणात अधिकाधिक प्रमाणात असलेला प्राणवायू शरीरातील प्रत्येक धमन्यांपर्यंत श्वासाव्दारे पोहोचविणे, हे आरोग्यदायी असते.  शिवाय तेलाची मॉलिश करणे आणि आंघोळ करताना उटणे लावणे, हेही त्वचेसाठी हितकारक असते....वेदशास्त्र संपन्न हरिभाऊशास्त्री जोशी सांगत होते.

दिवाळीतील अभ्यंगस्नानाचे धार्मिक किंवा अध्यात्मिक महत्त्व काय, या प्रश्नावर जोशीशास्त्री म्हणाले, भागवत पुराणातील कथेनुसार या दिवशी श्रीकृष्णाने नरकासूराचा वध केला. नरकारसूर हा अत्याचारी दैत्य होता. त्याचा वध करण्यासाठी जेव्हा भगवान कृष्णाने प्रहार केला. तेव्हा या राक्षसाने वर मागितला. श्रीकृष्ण म्हणाले, हे दैत्या, आजच्या चतुदर्शीच्या दिवशी जो कोणी पहाटे अभ्यंगस्नान करेल, ताला नरकयातना मिळणार नाहीत. तसेच अशा यातनेतून त्याची मुक्ती होईल.....पुराणातील भगवान कृष्णाच्या या वरदानाला शिरसावंद्य मानून भारतीय संस्कृतीत अभ्यंगस्नाची प्रथा रूढ झाली...जोशीशास्त्रींनी सांगितले.

दिवाळीच्या काळात थंडीचे वातावरण असते. या काळात त्वचा कोरडी पडते. त्यामुळे अंगाला तेल लावून स्नान केल्यामुळे त्वचेला तजेला येतो. शिवाय शरीरावरील सुरकुत्याही कमी होतात. तेल हे नेहमी सुगंधी असते. या सुगंधामुळे एक प्रसन्न आणि सकारात्मक मानसिकता निर्माण होते, असेही शास्त्रीजींनी सांगितले. 
-
अभ्यंगस्नान असे केले जाते...

  • अभ्यंगस्नानाच्या पध्दती प्रत्येक कुटुंबात वेगवेगळ्या असल्या तरी बहुसंख्य घरांमध्ये खालील पध्दतीचा वापर होतो.
  • व्यक्तीला पाटावर बसविले जाते
  • शरीराला सुंगधी तेलाचे मॉलिश केल जाते
  • कपाळाला कुंकुंमतिलक लावून ओवाळले जाते
  • पाटावर बसवून स्नान घातले जाते
  • स्नान घालताना सुगंधी उटणे शरीराला लावले जाते
  • स्नान झाले की, पुन्हा दिव्याने ओवाळले जाते.

-
उटण्यामधील मिश्रण
उटणे खास पध्दतीने बनविले जाते. यामध्ये शिकेकाईचा सर्वाधिक वापर असतो. शिकेकाईच्या बियांची पावडर तयार करून त्यामध्ये वाळा, ज्येष्ठमध, आंबेहळद, तुळस पाने आणि थोडासा कापूर मिसळला जातो.
 

Web Title: Abhyangananan of Diwali ... holy and healthy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.