गर्भवती पत्नीच्या पोटावर पोलीस उपनिरीक्षकाने लाथ मारल्याने गर्भपात; दिराकडूनही विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 11:29 AM2021-09-04T11:29:55+5:302021-09-04T11:30:15+5:30

पीडितेचे २०२० मध्ये मुंबई येथील पोलीस उपनिरीक्षक पदावर असलेल्या आरोपीसोबत कुर्डुवाडी येथे विवाह झाला होता.

Abortion after a police sub-inspector kicks a pregnant wife in the abdomen; Humiliation from Dira | गर्भवती पत्नीच्या पोटावर पोलीस उपनिरीक्षकाने लाथ मारल्याने गर्भपात; दिराकडूनही विनयभंग

गर्भवती पत्नीच्या पोटावर पोलीस उपनिरीक्षकाने लाथ मारल्याने गर्भपात; दिराकडूनही विनयभंग

googlenewsNext

सोलापूर:  ‘गर्भात वाढणारे मूल माझे नसून ते काढून टाक,’ असे म्हणत पत्नीचा गळा दाबून तिच्या पोटावर पोलीस उपनिरीक्षक पतीने लाथ मारली, तर दिराने विनयभंग केला. पीडित पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार, सात जणांवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पीडितेचे २०२० मध्ये मुंबई येथील पोलीस उपनिरीक्षक पदावर असलेल्या आरोपीसोबत कुर्डुवाडी येथे विवाह झाला होता. लग्नानंतर आरोपी हा आपल्या कुटुंबीयांसोबत पीडित पत्नीला मुंबई येथे घेऊन गेला. तेथे काही दिवस पत्नीला चांगले नांदविले. त्यानंतर, पीडितेची सासू, सासरे, दीर हे छोट्या-छोट्या कारणांवरून तिला त्रास देत, उपाशी ठेवत. दरम्यान, दिराने वाईट हेतूने पीडितेचा विनयभंग केला.

पतीने पत्नीला सोलापूर येथे आणून सोडून जाताना पीडितेच्या आई-वडिलांना शिवीगाळ करत निघून गेले. दरम्यान, लग्नाच्या वेळी मध्यस्थी करणाऱ्या चुलत सासऱ्यानेही विविध जाचक अटी-शर्ती घातल्या. या आशयाची फिर्याद पीडित महिलेने सोलापुरात दिली आहे. 

हे मूल माझे नाही-

पीडिता ही गर्भवती राहिली असता हे मूल माझे नाही, तुझे कोणाबरोबर तरी संबंध आहेत, असे म्हणत चारित्र्यावर संशय घेत, पीडितेचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. पत्नीच्या पोटावर जोरात लाथ मारल्यामुळे रक्तस्राव होऊन तिचा गर्भपात झाला. त्यानंतर, पतीने पत्नीला सोलापूर येथे आणून सोडले. 

Web Title: Abortion after a police sub-inspector kicks a pregnant wife in the abdomen; Humiliation from Dira

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.