ट्रॅक्टरची डिलरशिप देतो म्हणून १६ लाखाला फसवले! गुन्हा दाखल

By संताजी शिंदे | Published: March 12, 2024 05:24 PM2024-03-12T17:24:18+5:302024-03-12T17:26:16+5:30

ऑनलाईन व्यवहार, तिघांविरूद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

about 16 lakh cheated for giving a tractor dealership in solapur | ट्रॅक्टरची डिलरशिप देतो म्हणून १६ लाखाला फसवले! गुन्हा दाखल

ट्रॅक्टरची डिलरशिप देतो म्हणून १६ लाखाला फसवले! गुन्हा दाखल

संताजी शिंदे, सोलापूर: ट्रॅक्टरची डिलरशीप मिळवून देतो असे सांगून १६ लाख ३० हजार रूपयाची फसवणूक केल्याप्रकरणी, तिघांविरूद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा व्यवहार ऑनलाईन ट्रान्जेक्शनद्वारे झाला होता.

योगेश बाबू दिवेकर (वय ३३ रा. उत्कर्ष नगर विजापूर रोड, सोलापूर) यांना त्यांच्या ओळखीचे संजय राजन यांनी डिलरशीपसाठी ऑफर आहे असे सांगितले होते. संजय राजन यांनी एका ट्रॅक्टर कंपनीचा एरिया मॅनेजर असलेल्या त्यांच्या मित्राकडे नेले, तेव्हां त्यांनी ट्रॅक्टर कंपनीच्या डिलरशीपची ऑफर दिली. ऑफर मिळाल्याने डिलरशिपपोटी १० मार्च २०२२ रेजी योगेश दिवेकर यांनी तीन लाख रूपये दिले. त्यानंतर एरीया मॅनेजर ने परंडा येथील डिलरच्या मालकाकडून सब डिलर म्हणून टॅक्टर खरेदी विक्री करण्यासाठी १३ लाख ३० हजार रूपये घेतले. 

पैसे घेऊन देखील योगेश दिवेकर यांच्याकडील ट्रॅक्टर खरेदी विक्रीची डिलरशीप काढून घेतली. मात्र त्यापोटी घेण्यात आलेली १६ लाख ३० हजार रूपयाची डिपॉझिट आजतागायत परत केली नाही. पैशाची मागणी केली असता, सातत्याने टाळटाळ केली जात असल्याची फिर्याद योगेश दिवेकर यांनी दिली  आहे. या प्रकरणी ऋषीकेश पटवारी (रा. दमाणी नगर), नितीन जाधव, प्रविण बाळासाहेब करळे (रा. परांडा जि. धाराशिव) या तिघांविरूद्ध भादवि कलम ४२०, ४०६, ३४ प्रमाणे फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक व्हट्टे करीत आहेत.

Web Title: about 16 lakh cheated for giving a tractor dealership in solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.