कर्जमाफीसाठी आलेले जिल्हा बँकेकडील २७५ कोटी जुनी देण्यातच गेले,  आजही राज्य बँकेचे ६०० कोटींचे कर्ज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 02:51 PM2017-12-14T14:51:17+5:302017-12-14T14:53:13+5:30

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी शासनाकडून आलेले २७५ कोटी ४९ लाख २५ हजार १०७ रुपये ९१ पैसे जिल्हा बँकेने शासकीय कर्जरोखे व काढलेल्या कर्जात जमा केले आहेत.

About 275 crores of old loan defaulters have been made, the State Bank's 600 crores loan today! | कर्जमाफीसाठी आलेले जिल्हा बँकेकडील २७५ कोटी जुनी देण्यातच गेले,  आजही राज्य बँकेचे ६०० कोटींचे कर्ज !

कर्जमाफीसाठी आलेले जिल्हा बँकेकडील २७५ कोटी जुनी देण्यातच गेले,  आजही राज्य बँकेचे ६०० कोटींचे कर्ज !

googlenewsNext
ठळक मुद्देराज्य बँकेचे आजही जिल्हा बँकेवर ६०० कोटी रुपये कर्जसोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक मोठ्या आर्थिक टंचाईत होतीकारखानदार थकित कर्ज भरत नसल्याने शेतकºयांनीही पैसे भरण्याकडे पाठबँक कर्जमुक्त करण्याला प्राधान्य


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १४ : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी शासनाकडून आलेले २७५ कोटी ४९ लाख २५ हजार १०७ रुपये ९१ पैसे जिल्हा बँकेने शासकीय कर्जरोखे व काढलेल्या कर्जात जमा केले आहेत. राज्य बँकेचे आजही जिल्हा बँकेवर ६०० कोटी रुपये कर्ज असल्याचे अध्यक्ष राजन पाटील यांनी सांगितले.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक मोठ्या आर्थिक टंचाईत होती. बँकेच्या बड्या संचालकांनीच काढलेले कर्ज न भरल्याने जिल्हाभरातील शेतकरीही कर्ज भरण्यास तयार नाहीत. याचा परिणाम थकबाकी वाढीत भर टाकण्यात झाला. कारखानदार थकित कर्ज भरत नसल्याने शेतकºयांनीही पैसे भरण्याकडे पाठ फिरवली. राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना जाहीर केल्याने शेतकºयांकडील थकबाकी बºयापैकी वसूल होणार आहे. सुमारे ४०० कोटी रुपये शेतकºयांकडील थकबाकी वसूल होईल, असे बँकेचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. आतापर्यंत शासनाकडून आलेली कर्जमाफीची २७५ कोटी ४९ लाख २५ हजार १०७ रुपये इतकी रक्कम बँकेची जुनी देणी देण्यातच गेली आहे. शासकीय कर्ज रोख्यात रोखता व तरलता(सी.आर.आर. व एस.एल. आर.) मध्ये १६० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, ही गुंतवणूक आता ३५२ कोटी ४६ लाख रुपये इतकी झाली आहे. राज्य बँकेचे जिल्हा बँकेकडे ४९९ कोटी रुपये इतके कर्ज असून, यापैकी ६० कोटी रुपयांचा भरणा कर्जमाफीच्या रकमेतून करण्यात आला.
पुनर्गठणासाठी राज्य बँकेचे १३ कोटी ५० लाख रुपये ९.७५ टक्के दराने कर्ज काढले होते. हे १३ कोटी ५० लाख रुपये कर्ज भरणा करण्यात आला़ राज्य बँकेत जिल्हा बँकेची ३०० कोटी रुपयांची ठेव आहे. नोटाबंदीच्या कालावधीत चलनातील नोटांचा तुटवडा असल्याने १५० कोटी रुपये त्यावर कर्ज काढले होते. त्यापैकी ४१ कोटी ९९ लाख रुपयांचा कर्जापोटी भरणा केला असल्याचे सांगण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफीतून मिळालेली संपूर्ण २७५ कोटी ४९ लाख २५ हजार इतकी रक्कम बँकेची जुनी देणी देण्यातच गेली असून, आता नव्याने येणारी रक्कमही अशाच पद्धतीने उर्वरित कर्ज देण्यासाठी वापरली जाणार आहे. आजही बँकेवर ६०० कोटी रुपयांचे राज्य बँकेचे कर्ज असून, हे देणे देण्याला प्राधान्य दिले जाणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.
----------------------------
बँक कर्जमुक्त करण्याला प्राधान्य
- राज्य बँक, नाबार्ड अशा वित्तीय संस्थांकडून कमी व्याजाने रक्कम घेऊन ती शेतकºयांना कर्जाने दिली जाते. परंतु बहुतांशी शेतकरी घेतलेले कर्ज भरत नाहीत, मात्र राज्य बँक आमच्याकडून वसूल करते. पुन्हा कर्जमाफीची वाट शेतकरी व आम्हाला पाहावी लागते. यामुळे बँक अडचणीत येत असल्याने नव्याने कर्जच काढायचे नाही व पीक कर्जाच्या माध्यमातून होणारे गैरप्रकार थांबवण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी सांगितले. 

Web Title: About 275 crores of old loan defaulters have been made, the State Bank's 600 crores loan today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.