सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस; उजनी धरणाची प्लसकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 11:00 AM2020-07-14T11:00:40+5:302020-07-14T11:02:25+5:30

वरुणराजा पावला; उत्तर सोलापूर, अक्कलकोट वगळता सर्व तालुक्यात १०० टक्के नोंद

Above average rainfall in Solapur district; On the way to Ujani Dam Plus | सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस; उजनी धरणाची प्लसकडे वाटचाल

सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस; उजनी धरणाची प्लसकडे वाटचाल

Next
ठळक मुद्देएक जूनपासून सातत्याने जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडत आहेजून तसेच जुलै महिन्यात रविवारपर्यंत १४४ टक्के पाऊस मंगळवेढा तालुक्यात सर्वाधिक २२९.७  मि.मी. म्हणजे  १९२ टक्के पाऊस

सोलापूर : अनेक वर्षांनंतर जिल्ह्यात यंदा जून-जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. उत्तर सोलापूर व  अक्कलकोट तालुका वगळता इतर सर्वच  तालुक्यात १०० टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

यावर्षी एक जूनला पावसाला सुरुवात झाली. एक जूनपासून सातत्याने जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडत आहे. जून तसेच जुलै महिन्यात रविवारपर्यंत १४४ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. मंगळवेढा तालुक्यात सर्वाधिक २२९.७  मि.मी. म्हणजे  १९२ टक्के पाऊस पडला आहे. माढा तालुक्यात २४७ मि. मी.(१८२ टक्के), मोहोळ तालुक्यात २१५ मि.मी (१७०.६ टक्के), माळशिरस तालुक्यात २४० मि.मी. (१६४ टक्के), करमाळा तालुक्यात २०४  मि. मी. (१५१ टक्के), सांगोला तालुक्यात १९८ (१४९ टक्के), बार्शी तालुक्यात २३४  मि.मी. (१४७ टक्के),  पंढरपूर तालुक्यात १९४  मि.मी.(१३८ टक्के) तर दक्षिण सोलापूर तालुक्यात १४५ मि.मी. (१०४ टक्के) इतक्या पावसाची नोंद झाली आहे. अक्कलकोट तालुक्यात १५५ मि.मी. (९९ टक्के) तर उत्तर सोलापूर तालुक्यात १५४  मि.मी. (९२ टक्के) पाऊस पडला आहे.

मागील वर्षी  ६९ टक्के पाऊस 
यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडला असला तरी मागील वर्षी जिल्ह्यात एकूण ६९ टक्के (९८.८ मि.मी.) पाऊस पडला होता. यावर्षी जिल्ह्यात एकूण २०५ मि.मी. म्हणजे १४४ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

सध्या पडलेल्या पावसामुळे समाधानाचे वातावरण आहे. पेरणी झालेली पिके चांगली येतील; मात्र अधिक पाऊस पडला तर नुकसानही होईल. जेमतेम पाऊस पडत राहिला तर खरीप हंगाम चांगला होईल.
- राजाराम गरड, शेतकरी, रानमसले

Web Title: Above average rainfall in Solapur district; On the way to Ujani Dam Plus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.