लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; सोशल मीडियावर झाली मैत्री
By रवींद्र देशमुख | Published: May 23, 2024 06:47 PM2024-05-23T18:47:36+5:302024-05-23T18:48:05+5:30
सुरूवातीच्या काळात त्यांच्यामध्ये मैत्री होती, त्यानंतर त्याचे रूपांतर प्रेमात झाले.
सोलापूर : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी, एका विरूद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत महिलेची व गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीची २०१८ मध्ये ओळख फेसबुकवर झाली होती. सुरूवातीच्या काळात त्यांच्यामध्ये मैत्री होती, त्यानंतर त्याचे रूपांतर प्रेमात झाले. तो पीडितेच्या घरी येणे जाणे करू लागला. दोघांचे सातत्याने मोबाईलवर बोलणे सुरू झाले. एके दिवशी तो घरी आला, तेव्हां त्याने आपण दोघे लग्न करू, असे म्हणाला.
लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर अत्याचार केला. तेथून पुढे तो तिला बाहेर भेटून अत्याचार करू लागला. पीडितेने लग्नाबाबत विचारले असता, त्याने २ मे २०२४ रोजी करू असे सांगितले होते. मात्र त्यानंतर तो भेटण्यासाठी आला नाही. वारंवार कॉल केला तर फोन उचलला नाही. त्यामुळे पीडितेने फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पिडीतेने दिलेल्या फिर्यादीवरून सोमनाथ रमेश पवार (रा. सोलापूर) याच्या विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक गायकवाड करीत आहेत.