१५३ सहकारी संस्थांच्या निवडणूक हालचालींना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:20 AM2021-02-15T04:20:26+5:302021-02-15T04:20:26+5:30
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ सीबी व महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम २०१४ चे कलम ...
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ सीबी व महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम २०१४ चे कलम ३ (पाच) अन्वये प्राप्त अधिकारानुसार निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर स्थगित झाल्या, त्या टप्प्यापासून निवडणुकीसाठी तयार केलेल्या जिल्हा निवडणूक आराखड्यातील प्रथम टप्प्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया १५ फेब्रुवारीपासून सुधारित कार्यक्रमानुसार सुरू करण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत.
यामुळे मुदत संपलेल्या सांगोला तालुक्यातील १५३ सहकारी संस्थांची निवडणूक जिल्हा निवडणूक आराखड्यानुसार ६ टप्प्यांत घेण्याचे नियोजन केले आहे. सहकार विभागाने जिल्हा निबंधकांना मतदार यादी अपडेट करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. यामुळे सांगोला तालुक्यातील अ वर्गातील २, ब वर्गातील ८०, क वर्गातील ५३, ड वर्गातील १८ अशा एकूण १५३ पतसंस्था, मजूर संस्था, विकास सेवा सोसायटी, नागरी बँकाच्या निवडणुका होणार आहेत.