दुधनी नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी हालचालींना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:20 AM2021-02-15T04:20:24+5:302021-02-15T04:20:24+5:30
पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांनी आपापल्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन उमेदवारी व निवडणुकीबाबत ...
पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांनी आपापल्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन उमेदवारी व निवडणुकीबाबत चर्चा, चाचपणी करून मार्गदर्शन केले. तसेच पारंपरिक विरोधक भाजपचे नगराध्यक्ष भीमाशंकर इंगळे, नगरसेवक महेश पाटील, अतुल मेळकुंदी, अप्पू परमशेट्टी, बसवराज हौदे, बाबा टक्कळकी, हणमंत कलशेट्टी, गुरुषांत अल्लापुरे, रेवनसिद्ध माशाळ, गुरुबाळ परमशेट्टी, बसवराज गुरुबटटी, हणमंत फुलारी, नागनाथ तड्डी, गुरुशांत कोळी यांनीही आ. सचिन कल्याणशेट्टी यांची भेट घेऊन निवडणूक लढविण्याबाबत चर्चा केली. ही निवडणूक लढविण्यावर एकमत झाल्याचे चर्चा आहे. एकूणच केवळ आठ महिन्यांचा कालावधी राहिलेला असताना निवडणूक न होता बिनविरोध होईल, अशी चर्चा होती. मात्र, सध्याचे वातावरण पाहता ही निवडणूक बिनविरोध होेणार नसल्याची चर्चा सुरू आहे. म्हेत्रे यांचे प्रभाग क्रमांक १ हे ओबीसीसाठी राखीव जागा आहे. याठिकाणी १ हजार २०० एकूण मतदार आहेत.
वारसदार कोण होणार, दुधनीत चर्चा
दिवंगत सातलिंगप्पा म्हेत्रे सलग ५० वर्षे नगरसेवक म्हणून राहिले. चार वेळा स्वतः बिनविरोध नगराध्यक्ष तर चार वेळा त्यांची सून अन्नपूर्णा म्हेत्रे यांनी नगराध्यक्षपदी विराजमान झाले होते. सातलिंगप्पा म्हेत्रे यांचे नगरपालकेतील वारसदार कोण होणार याची दुधनीत चांगलीच चर्चा सुरू आहे. यामध्ये प्रथमेश शंकर म्हेत्रे, डॉ. उदय मल्लिनाथ म्हेत्रे, संगमनाथ शरणप्पा म्हेत्रे या तीन नावांची चर्चा आहे.