दक्षिणमध्ये ज्वारी काढणीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:27 AM2021-02-25T04:27:55+5:302021-02-25T04:27:55+5:30
फेब्रुवारी अखेर असूनही थंडी मोहोळ : फेब्रुवारी महिना अखेर आला तरी यावर्षी थंडी कायम आहे. या वर्षीच्या मोसमात सर्व ...
फेब्रुवारी अखेर असूनही थंडी
मोहोळ : फेब्रुवारी महिना अखेर आला तरी यावर्षी थंडी कायम आहे. या वर्षीच्या मोसमात सर्व नक्षत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे सध्या नदी, नाले, तलाव, विहिरी, बोअर या पाणीस्रोतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे. त्यामुळे शेतक-यांनी पिकांना पाणी दिल्यानंतर थंडी जाणवत असल्याचे शेतक-यांनी सांगितले.
कोरोनामुळे पुन्हा शाळा होणार बंद
मंगळवेढा : कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्याने महिनाभरापूर्वीच प्राथमिक, माध्यमिक शाळा टप्प्या-टप्प्याने सुरु झाला आहेत. सुरळीत वर्ग सुरू होताच पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. परिणामी कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
ऊसतोड कामगार परतू लागले
मोहोळ : ऑक्टोबर दरम्यान यंदा तालुक्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला. यावर्षी उसाचे क्षेत्र जास्त असल्याने ऊसतोड कामगारांची टंचाई जाणवली. काही कारखान्यांनी हार्वेस्ट मशीन खरेदी केल्या. त्यामुळे गळीत हंगाम गतीने पार पडला. आता हंगाम अंतिम टप्प्यात आहे. शिवाय ऊसही संपल्याने कारखान्यांनीही हंगामाची आटोपता घेतला. आता ऊसतोड कामगार परतू लागल्याचे चित्र आहे.