वीजबिलाच्या स्वरूपात धान्य स्वीकारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:24 AM2021-08-26T04:24:30+5:302021-08-26T04:24:30+5:30
वेळापूर : महावितरणच्या अधिकाऱ्यांना बिलाच्या स्वरूपात भाजीपाला देत भाजपने वेळापुरात अनोखे आंदोलन केले. माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांचा खंडित केलेला वीजपुरवठा ...
वेळापूर : महावितरणच्या अधिकाऱ्यांना बिलाच्या स्वरूपात भाजीपाला देत भाजपने वेळापुरात अनोखे आंदोलन केले. माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांचा खंडित केलेला वीजपुरवठा सुरू करण्यासाठी भाजपचे जिल्हा सहप्रभारी के.के. पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.
साहेब पैसे नाहीत, वीजबिल म्हणून शेतीमाल स्वीकारा, शेतकऱ्यांची वीजबिल भरण्याची इच्छा आहे. परंतु पैसे नाहीत. सध्या शेतीमध्ये जी पिके आहेत त्या पिकांना दर नाही. पिकांवर रोग पडलाय. उसाला हुमनी व लोकरी मावा आहे. डाळिंब बागा तेल्या रोगाने उद्ध्वस्त झाल्या आहेत. मक्यावर अळी व माव्याचा प्रादुर्भाव आहे. भाजीपाला मातीमोल दराने विकला जातोय. थकबाकीदार शेतकऱ्याकडे उपलब्ध असणारा शेतीमाल वीजबिल भरून वीजबिल म्हणून स्वीकारावा व लोडशेडिंग बंद करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी के.के. पाटील यांनी केली.
ज्या पद्धतीने जुन्या काळात पैशाच्या ऐवजी वस्तूमध्ये व्यवहार व्हायचे तसेच आमच्याकडे उपलब्ध असणारा शेतीमाल वीजबिल म्हणून स्वीकारावा व लोडशेडिंग बंद करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी के.के. पाटील यांनी केली.
या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सोपान नारनवर, ओबीसी मोर्चा माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे, तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण माने, बलभीम जाधव, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष दादासाहेब खरात, किरण पाटील, जब्बार आतार, विनोद थिटे, अमर मगर उपस्थित होते.
निमगाव, मळोली, डोंबाळवाडी, खुडूस गावातील शेतकरी उपस्थित होते.
-----
फोटो : २४ वेळापूर
वेळापूरमध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यांना थकीत बिलाचा भाजीपाला देताना के.के. पाटील, सोपान नारनवर, बाळासाहेब वावरे, संजय देशमुख, लक्ष्मण माने, सोपान नारनवर, बाळासाहेब वावरे, संजय देशमुख, लक्ष्मण माने.
---