बार्शी-कुर्डूवाडी रस्त्यावर अपघात; दोन ठार, सात प्रवासी जखमी
By Appasaheb.patil | Published: September 27, 2019 01:28 PM2019-09-27T13:28:44+5:302019-09-27T13:35:16+5:30
पुणे-लातूर बसला अपघात; अपघातामधील जखमींवर बार्शीत उपचार सुरू
सोलापूर : बार्शीहुन कुर्डूवाडीकडे जाणाºया मार्गावर एका हॉटेलसमोर उभ्या असलेल्या मालट्रकला पुण्याहुन लातूरला जाणारी राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसने (एमएच २० बीएल ३८२१) पाठीमागून जोराची धडक दिली़ या धडकेत बसमधील दोघांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली.
सुधाकर होळकर (रा. लातूर) व दिनेश कुमुटवार (रा़ केज) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर हरिराम निवृत्ती मेटकरी (रा. धानोरा, जि़ लातूर), सुनील ज्ञानेश्वर जाधव (रा. धोत्रे, ता़ बार्शी), जब्बार रसूल तांबोळी (रा़ येरमाळा, ता. कळंब, जि़ उस्मानाबाद), अशोक राम नंदनवार (रा. हलकी जि़ लातूर), सुशांत चंद्रकांत मनसरे (रा. भिसे, वाघोली), दिलीपकुमार रघुनाथ कांबळे (रा. चाकूर), वैजिनाथ गाढवे (रा. वरूडा, ता़ जि़ उस्मानाबाद) अशी जखमींची नावे आहेत. या जखमींवर बार्शी येथभल रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती कळताच बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे, दिनेश कुंभार, हवालदार राजेंद्र मंगरूळे, सचिन माने, योगेश मंडलिक, माधव धुमाळ यांनी भेट दिली़ त्यानंतर जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले.