देवदर्शनाला जाताना कारचा अपघात; सहा जण ठार, दोघे जखमी

By appasaheb.patil | Published: February 1, 2020 11:04 AM2020-02-01T11:04:34+5:302020-02-01T12:20:11+5:30

वेळापूरजवळ झाला अपघात; कार व सिमेंट वाहतूक करणाºया टँकरची समोरासमोर धडक

Accident near Timepur; Five people were killed on the spot | देवदर्शनाला जाताना कारचा अपघात; सहा जण ठार, दोघे जखमी

देवदर्शनाला जाताना कारचा अपघात; सहा जण ठार, दोघे जखमी

Next
ठळक मुद्देकार आणि सिमेंट वाहतूक करणाºया टँकरची समोरासमोर धडक अपघातामधील सर्वजण सोलापूर जिल्ह्यात वैराग येथील आहेतघटनास्थळी वेळापूर पोलिस दाखल झाले आहेत

सोलापूर : पुणे- पंढरपूर महामार्गावर वेळापूरजवळ सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास टँकर व कारचा अपघात झाला़ या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. 

या अपघातात ठार व जखमी झालेले सर्वजण वैराग (ता. बार्शी) येथील आहेत.  वैराग येथील फलफले कुटूंबीय जेजुरी येथे सकाळी देवदर्शनाला जात होते. मात्र, वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे.  या अपघातात शिवराज नागेश फलफले (वय ३८), दिनानाथ उर्फ बाबासो नागेश फलफले (वय ३४), वनिता शिवराज फलफले (वय ३० वर्षे), उत्कर्ष शिवराज फलफले (वय ९ वर्षे ),  सहयाद्री बाबासो फलफले (वय ६), पार्वती महादेव फलफले (वय ८० वर्षे), सर्व रा. वैराग ता. माढा यांचा जागीच मृत्यू झाला आहे़  तर पुजा दिनानाथ उर्फ बाबासो फलफले (वय २८), उत्कर्षा शिवराज फलफले (वय ११) अशी जखमींची नावे आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वेळापूरजवळ पुणे- पंढरपूर महामार्गावर कार आणि सिमेंट वाहतूक करणाºया टँकरची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघात कारचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यु झाला. कार पुण्याहून वैरागकडे येत असताना हा अपघात झाला. अपघातामधील सर्वजण सोलापूर जिल्ह्यात वैराग येथील आहेत. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींवर वेळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत. घटनास्थळी वेळापूर पोलिस दाखल झाले आहेत. 

Web Title: Accident near Timepur; Five people were killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.