अक्कलकोटजवळ मालट्रक व कारचा अपघात; तीन ठार, चार जण जखमी 

By Appasaheb.patil | Published: November 23, 2022 06:22 PM2022-11-23T18:22:10+5:302022-11-23T18:23:17+5:30

मृतांमध्ये लहान मुलीचाही समावेश.

Accident of goods truck and car near Akkalkot Three killed four injured | अक्कलकोटजवळ मालट्रक व कारचा अपघात; तीन ठार, चार जण जखमी 

अक्कलकोटजवळ मालट्रक व कारचा अपघात; तीन ठार, चार जण जखमी 

Next

अक्कलकोट : कर्नाटकातील इंडी येथून मुलगी पाहण्यासाठी अक्कलकोट मार्गे आळंद येथे जात कार मधून एकाच कुटुंबातील सात जण जात होते. शिरवळजवळ समोरून आलेल्या मालट्रक व कार मध्ये समोरासमोर भीषण अपघात झाला. यामध्ये कारमधील तिघेजण जागेवर ठार झाले आहेत. यामध्ये एका लहान मुलीचा समावेश आहे.

दरम्यान, ही घटना दि.२३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३:१५ वाजता घडली आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे व त्यांच्या कार्येकर्त्यांनी तात्काळ मदत करून जखमींना अक्कलकोट येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Accident of goods truck and car near Akkalkot Three killed four injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात