पंढरपूरजवळ स्वेरी महाविद्यालयातील संचालकाचा अपघात; दोघेजण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 05:35 PM2018-12-16T17:35:22+5:302018-12-16T17:38:50+5:30
पंढरपूर : तुंगत ( ता. पंढरपूर ) नजीक झालेल्या अपघातात पंढरपूर येथील स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील वाहन चालक व शिपाई ...
पंढरपूर : तुंगत ( ता. पंढरपूर) नजीक झालेल्या अपघातात पंढरपूर येथील स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील वाहन चालक व शिपाई ठार झाला. तर एक संचालक जखमी झाल्याची घटना सकाळी नऊ च्या सुमारास घडली आहे. प्रशांत दत्तात्रय पाटोळे ( रा. मेंढापुर, ता. पंढरपूर) व सागर शामराव लोंढे ( रा. आंबे चिंचोली, ता. पंढरपूर) असे मयत झालेल्यांची नावे आहेत.
स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कार्यक्रमानिमित्त आलेले प्रमुख पाहुण्यांना मुंबाईला सोडण्यासाठी दादासाहेब धोंडीबा रोंगे ( रा. खर्डी, ता. पंढरपूर) गेले होते. ते रेल्वे नी माघारी येत, असल्याने त्यांना मोहळ येथून आणण्यासाठी वाहन चालक सागर शामराव लोंढे व शिपाई प्रशांत दत्तात्रय पाटोळे हे एम एच १३ सी के ११६९ ही चार चाकी जीप घेऊन गेले होते. हे तिघे मोहळ वरून पंढरपूरला येत असताना तुंगत ( ता. पंढरपूर) नजीक त्यांच्या गाडीला कुत्रा अडवा आला. त्या कुत्राला वाचविण्याच्या प्रयत्नात गाडी झाडावर आदळली. या अपघातात प्रशांत दत्तात्रय पाटोळे हा जागीच ठार झालाय आहे. तर वाहन चालक सागर भीमराव लोंढे याला उपचारासाठी सोलापूरला घेऊन जाताना त्याचा मृत्यू झाला आहे. तर स्वेरी कॉलेजचे संचालक दादासाहेब रोंगे यांच्या पायाला व छातीला गंभीर जखम झाली आहे. दादासाहेब रोंगे हे स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांचे चुलत बंधू आहेत. त्यांच्यावर मिरज येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.