केगांव बु, येथील दोन भावंडांचा अपघाती मृत्यू; पुण्यातून सोलापूरकडे येताना झाला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 10:52 AM2021-04-18T10:52:47+5:302021-04-18T10:53:24+5:30

पंकज देसाई आणि राहुल देसाई या चुलत बंधूंच्या मृत्यूने कुटुंबासह परिसरात शोककळा

Accidental death of two siblings at Kegaon Bu; The accident happened while coming to Solapur from Pune | केगांव बु, येथील दोन भावंडांचा अपघाती मृत्यू; पुण्यातून सोलापूरकडे येताना झाला अपघात

केगांव बु, येथील दोन भावंडांचा अपघाती मृत्यू; पुण्यातून सोलापूरकडे येताना झाला अपघात

Next

सोलापूरअक्कलकोट तालुक्यातील केगांव बु या गावात शेतकऱ्यांचे मोटार रिवाडींग करणाऱ्या इरप्पा देसाई यांचा मुलगा पंकज देसाई आणि शेतकरी सिद्धाराम देसाई यांचा एकुलता एक मुलगा राहुल देसाई यांचा काल रात्री पुण्यात अपघाती मृत्यू झाला.
सोलापूर जिल्हा हा रोजगारांचा वणवा असलेला जिल्हा. या जिल्ह्यातील अनेक मुलं हाताला काम मिळाव या हेतूने आपल्या आई वडिलांना,आपल्या गावाला सोडून   कामासाठी पुण्याला जातात. त्यातलीच हे दोन तरुण, 27 वयाचा पंकज देसाई आणि अवघ्या 25 वयाचा राहुल देसाई....


महाराष्ट्रात कोरोना वाढत असल्याने  शासनाने लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊन पडल्याने पुण्यात काम करणाऱ्या या मुलांना कंपनीने सुट्या दिल्या. कंपनी बंद,मेस बंद मग या मुलांनी करावं काय ? पर्याय एकचं लॉकडाऊन हटेपर्यंत आपल्या गावाकडे जावं. याचं पर्यायाचा विचार करून काल पंकज देसाई आणि राहुल देसाई हे तरुण कंपनीच्या कामावरून आल्यावर गावाकडं निघाली. आपल्या गावाकडे आई-वडिलांच्या कुशीत विसावण्यासाठी येणाऱ्या या दोन मुलांवर रात्री काळाने घाला घातला आणि ती कायमची आई वडिलांची कुशी सोडून देवाच्या कुशीत विसावली.
पंकज देसाई हा इरप्पा देसाईंचा मोठा मुलगा, मुलाच लग्न करावं म्हणून मोठ्या हौसेनी वडिलांनी गावात घर बांधले. दिवाळीत मुलाचं हात पिवळ करण्याचा आतच पंकज वडिलांना सोडून गेला,किती हे दुर्दैव ?. यापेक्षा मोठी दुर्दैव म्हणजे सिद्धाराम देसाई यांचा,एकुलता एक मुलगा,यापूर्वीच पत्नीला देवाज्ञा आली होती.

ज्याच्याकडे बघून आशेने जगावं तर तोच बापाचा हात अर्ध्यावर सोडून जगाचा निरोप घेतला..! किती हे महाभयंकर दुर्दैव. देव एवढा कठोर होऊ शकतो का..?
केगांव मधील तरुणामध्ये नेहमी मिसळणाऱ्या पंकज देसाई आणि राहुल देसाई या चुलत भावंडांच्या मृत्यूने अख्य गावं शोक सागरात बुडाली आहे.सर्व तरुण बैचेन झाली आहेत.पुण्यावरून निघताना घरच्यांशी आणि  गावातील काहीं मित्रांशी या मुलांनी गावाकडे येत असल्याबद्दल रात्री फोन वरून संभाषण साधली होती.रात्री चांगल्या बोललेल्या मित्राची  बातमी काही तासात अशी येईल असे वाटले नव्हते. लहान वयात अर्ध्यावर डाव  मोडल्याने या हृदयद्रावक घटनेने मित्रमंडळीसह कुटुंबावर शोककळा पसरली आहे.


 पंकज देसाई याच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ,एक बहीण असा परिवार आहे,तर राहुल देसाई याच्या पश्चात फक्त त्याचा दुर्दैवी बाप आणि दोन बहिणी आहेत.

Web Title: Accidental death of two siblings at Kegaon Bu; The accident happened while coming to Solapur from Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.