सन्मान योजनेतील पात्र शेतकºयांच्या खात्याची पडताळणी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 12:26 PM2019-07-31T12:26:32+5:302019-07-31T12:30:14+5:30

पाच लाखांवर शेतकरी: अकरा हजार खात्यांमध्ये माहिती भरणे सुरू

The accounts of the eligible farmers of the honor scheme will be verified | सन्मान योजनेतील पात्र शेतकºयांच्या खात्याची पडताळणी होणार

सन्मान योजनेतील पात्र शेतकºयांच्या खात्याची पडताळणी होणार

Next
ठळक मुद्देशेतकरी सन्मान योजनेतील काम गेल्या दोन महिन्यांपासून जलदगतीने जिल्हा प्रशासनाकडून सुरूजिल्ह्यात ८ - अ नुसार एकूण ११ लाख १४ हजार ९५ इतकी खातेदार शेतकºयांची संख्याएप्रिलअखेर २ लाख ६0 हजार ८२८ शेतकरी कुटुंबाची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली

सोलापूर :  केंद्र शासनाच्या  पीएफएमएस संस्थेकडून  (पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टम) प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या बँक खात्याची पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी दिली असून यानंतर अंतिम यादीनुसार योजनेतील शेतकºयांना सन्मान निधी थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

शेतकरी सन्मान  योजनेतील काम  गेल्या दोन महिन्यांपासून जलदगतीने जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. जिल्ह्यात ८ - अ नुसार एकूण ११ लाख १४ हजार ९५ इतकी खातेदार शेतकºयांची संख्या आहे. यामध्ये कृषी सन्मान योजनेस पात्र ठरलेले शेतकरी ५ लाख १३ हजार ११ इतके आहेत. एप्रिलअखेर २ लाख ६0 हजार ८२८ शेतकरी कुटुंबाची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. यानंतर पुन्हा उर्वरित पात्र शेतकरी कुटुंबांची  माहिती अपलोड  करण्यात येत आहे. आतापर्यंत ५ लाख २ हजार ६४ इतक्या शेतकºयांची माहिती अपलोड करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. अद्याप १0 हजार ९४७ इतक्या शेतकºयांची माहिती अपलोड करण्याचे काम शिल्लक राहिले आहे.

यासाठी शेतकºयांकडील नोंदी, बँक खाते व इतर बाबींमुळे हे काम शिल्लक राहिले आहे. येत्या आठवडाभरात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसाठी जिल्ह्यातील पात्र शेतकºयांची माहिती शासनाच्या एनआयसी पोर्टलवर अपलोड करण्याचे काम ९८ टक्के झाले आहे. 

आता शेवटच्या टप्प्यात एकत्रित कुटुंबात सातबारावर असलेली अनेक नावे, गाव सोडून इतरत्र गेलेल्या खातेदारांच्या बँक खात्याची माहिती मिळणे अवघड झाले आहे. संबंधित शेतकºयांच्या कुटुंबातील सदस्यांना याबाबतची कल्पना देऊन हे काम शंभर टक्के पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. 

काय होणार तपासणी?
- जिल्ह्यातून एनआयसी पोर्टलवर अपलोड झालेल्या पात्र शेतकºयांचा डाटा केंद्र शासनाच्या पीएफएमएस या संस्थेकडून तपासण्यात येणार आहे. तपासणीमध्ये शेतकºयांचे बँक खाते आणि त्यांनी दिलेल्या खातेनंबरच्या बँकांच्या आयएफएससी कोडची पडताळणी केली जाणार आहे. या तपासणीमुळे शेतकºयांच्या नावेच पैसे जमा होणार आहेत. पैसे जमा करण्याच्या प्रक्रियेत चुका होऊ नयेत म्हणून ही खबरदारी घेण्यात आल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी देशमुख यांनी स्पष्ट केले.

Web Title: The accounts of the eligible farmers of the honor scheme will be verified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.