गाढवे खून प्रकरणात विसंगत साक्षीमुळे सुटले आरोपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:41 AM2021-03-04T04:41:05+5:302021-03-04T04:41:05+5:30
निर्दोष मुक्तता झालेल्यांमध्ये प्रशांत रिकिबे, अमोल मोहिते, नितीन माने, गणेश पिसे, दत्तात्रय तौर, दिनेश कोरे,उमेश शेट्टी ...
निर्दोष मुक्तता झालेल्यांमध्ये प्रशांत रिकिबे, अमोल मोहिते, नितीन माने, गणेश पिसे, दत्तात्रय तौर, दिनेश कोरे,उमेश शेट्टी व विक्रम उर्फ पांडू पवार (सर्व रा.बार्शी) यांचा समावेश आहे. ही खुनाची घटना बार्शी उस्मानाबाद रोडवरील आर्यन शुगर या कारखान्याकडे जाणाऱ्या तांदुळवाडी गावाजवळ ३१ मे २०१४ रोजी घडली होती. याबाबत मयताचे चुलते सोमनाथ गाढवे यांनी पांगरी पोलिसात तक्रार देताच ८ जणांवर गुन्हा नोंदला होता. पोलिसांनी तपास करून ८ जणांना अटक केली होती. यातील आरोपी दिनेश कोरे, उमेश शेट्टी व विक्रम पवार हे तिघे जामिनावर होते तर इतर ५ जण आजपर्यंत जेलमध्येच होते.
याबाबत पांगरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक ओहळ यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून अब्बास काझी (सोलापूर ), आरोपी कोरे याच्या वतीने ॲड. शशी कुलकर्णी,ॲड. मिलिंद खुपसरे व इतर आरोपीच्या वतीने ॲड. श्रीकांत जाधव सांगली, सचिन नायकोजी, ॲड. देवदत्त बोरगावकर काम पाहिले.