पंढरीतील नगरसेकाच्या खून प्रकरणी ४१ महिन्यानंतर पकडले आरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:23 AM2021-08-29T04:23:32+5:302021-08-29T04:23:32+5:30

पंढरपूर : पंढरपुरातील नगरसेवक संदीप दिलीप पवार यांच्या खून प्रकरणातील ४१ महिन्यांपासून फरार असलेल्या सुनील वाघ (वय-३३,गोपाळपूर) दुसरा सचिन ...

Accused arrested after 41 months in Pandhari corporator murder case | पंढरीतील नगरसेकाच्या खून प्रकरणी ४१ महिन्यानंतर पकडले आरोपी

पंढरीतील नगरसेकाच्या खून प्रकरणी ४१ महिन्यानंतर पकडले आरोपी

Next

पंढरपूर : पंढरपुरातील नगरसेवक संदीप दिलीप पवार यांच्या खून प्रकरणातील ४१ महिन्यांपासून फरार असलेल्या सुनील वाघ (वय-३३,गोपाळपूर) दुसरा सचिन देवमारे (वय- ३३, संत पेठ,पंढरपूर) हे संशयित आरोपी कर्नाटकात त्यांचे नाव बदलून राहायचे. दर तीन महिन्याला वेशांतर करायचे. त्याला पंढरपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोठ्या शिताफीने शुक्रवारी पेरिया पाटणा (जि. म्हैसूर, राज्य कर्नाटक) येथून ताब्यात घेतले. यातील सुनील वाघा याला न्यायालयाने नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पंढरपुरातील नगरसेवक संदीप पवार यांचा १८ मार्च २०१८ रोजी स्टेशन रोडवरील श्रीराम हॉटेलमध्ये बंदुकीने गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून खून झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी सरजी गँगमधील २४ जणांना अटक केली होती. यामध्ये सरजी ऊर्फ गोपाळ अंकुशराव याचाही समावेश होता. या सर्वांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती.

यातील सुनील वाघ, सचिन देवमारे व अन्य एकजण घटना घडल्यापासून फरार होते. सुनील वाघ हा कर्नाटकातील म्हैसूर येथे नाव बदलून विक्रम देशमुख या नावाने राहत होता. ही खबर पोलिसांना मिळाली. त्यांनी शुक्रवारी सुनील वाघ, सचिन देवमारे या दोघांना उचलून ताब्यात घेतले आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पंढरपूर उपविभागीय पोलीस अधीक्षक विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि राजेंद्र मगदुम, हवालदार शरद कदम, सूरज हेंबाडे, राजेश गोसावी, पोलीस सुनील बनसोडे, सुजित जाधव, विनोद पाटील यांनी केली.

----

म्हैसूरमध्ये पोलिसांचा १५ दिवस मुक्काम

सुनील वाघ म्हैसूर येथे राहत असल्याची कुणकुण पोलिसांना लागली. यानंतर पंढरपूर प्रकटीकरण शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याचा शोध घेण्यासाठी पंधरा दिवस म्हैसूरमध्ये मुक्काम केला. वेगवेगळ्या वेशामध्ये पोलीस कर्मचारी सुनील वाघला शोधत होते. कर्नाटकमध्ये राहताना वाघ याने बनावट आधार कार्ड तयार केले होते. त्याचा वापर करून तो म्हैसूरमध्ये मुक्तपणे संचार करत असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.

----

फोन करण्यासाठी इतर राज्यात जायचा

फोन लोकेशनवरून पोलीस आपला शोध घेऊ नये. यासाठी सुनील वाघ यांनी ६० वेळा सीमकार्ड बदलले आहे. इतर लोकांना फोन करण्यासाठी सुनील वाघ इतर राज्यात जाऊन फोन करायचा. तसेच सांकेतिक भाषेचा वापर करून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींशी संपर्क साधायचा. सांकेतिक भाषेमध्ये एक गुंठा म्हणजे एक दिवस, तिरुपती बालाजी म्हणजे काही अडचण नाही, पाची बोटे तुपात म्हणजे पोलीस आहेत, आपल्याला अडवले म्हणजे त्या ठिकाणी ये असे अनेक वेगवेगळ्या सांकेतिक कोडचा समावेश होता अशी माहिती पंढरपूर उपविभागीय पोलीस अधीक्षक विक्रम कदम यांनी सांगितली.

-----

खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या संशयित आरोपी सुनील वाघ याला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस कर्मचारी व अधिकारी.

----

Web Title: Accused arrested after 41 months in Pandhari corporator murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.