मोक्का केसमधील आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:42 AM2021-02-28T04:42:58+5:302021-02-28T04:42:58+5:30
मिथुन काळे हा पुळूज परिसरात येऊन गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सहा. पोलीस निरीक्षक शंकरराव ओलेकर यांना मिळाली. त्याप्रमाणे ...
मिथुन काळे हा पुळूज परिसरात येऊन गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सहा. पोलीस निरीक्षक शंकरराव ओलेकर यांना मिळाली. त्याप्रमाणे तत्काळ ते स्वत: व सहा. पोलीस निरीक्षक खरात हे पथकासह खासगी वाहनाने पुळूज परिसरात गेले. पुळूजकडे जाताना लागणाऱ्या कमानीजवळील द्राक्षाच्या बागेमध्ये पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. त्याच्यावर पोलीस ठाण्यात गु. र. क्र. ७०२/२०१७ भादंविक ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४, गु.र. क्र. २०१/२०१९ भादंविक ३९४, ३२७, ३४, गु. र. क्र. २७९/२०१९ भादंविक ३५३, १४३, गु. र. क्र. २८१/२०१९ भारतीय हत्यार अधिनियम कलम ४, २५, गु. र. क्र. २७२/१९ भादंविक ३९५, ३९७,३ ४२ सह मोक्का कायद्याप्रमाणेे, त्याचबरोबर अकलूज पोलीस ठाण्यात १६६/२०१६ भादंविक ३७९ असे अनेक गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई खरात, ओलेकर यांच्यासह सुजित उबाळे, सोमनाथ नरळे, देवेंद्र सूर्यवंशी यांनी केली.