गांजा प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:39 AM2021-02-06T04:39:31+5:302021-02-06T04:39:31+5:30
२३ जानेवारी रोजी लकप्पा पुजारी व रामचंद्र पुजारी अन्य एकजण असे तिघांची गांजाची शेती असल्याचे वृत्त पोलिसांना समजले. त्यावरून ...
२३ जानेवारी रोजी लकप्पा पुजारी व रामचंद्र पुजारी अन्य एकजण असे तिघांची गांजाची शेती असल्याचे वृत्त पोलिसांना समजले. त्यावरून पोलीस निरीक्षक विजय जाधव व त्यांच्या पथकाने २३ जानेवारी रोजी छापा मारून कारवाई केली. तेव्हा साडेसहा लाख रुपये किमतीचा ८३ किलो गांजा आढळून आला. तेव्हा लकप्पा पुजारी, रामचंद्र पुजारी व अन्य एकजण या तिघांवर दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात वरील दोघांना पोलिसांनी करून न्यायाधीश नंदागवळे यांच्या समोर उभे केले असता १ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. ती संपताच सोलापूर येथील विशेष न्यायालयात हजर केले असता त्या दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपीतर्फे ॲड. अनिल मंगरुळे तर फिर्यादीकडून सरकारी वकील गिरीश सरवदे यांनी काम पाहिले. या घटनेतील आणखीन एक आरोपी फरार झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय जाधव हे करीत आहेत.