शंभूराजेंचा इतिहास आत्मसात करा :यशवंत गोसावी
By admin | Published: May 19, 2014 12:14 AM2014-05-19T00:14:42+5:302014-05-19T00:14:42+5:30
संभाजी आरमारतर्फे युवक मेळावा
सोलापूर : शिवाजी महाराजांच्या निधनानंतर तलवारीच्या पातीवर नऊ वर्षे अखंडपणे औरंगजेबाला सह्याद्रीच्या दर्याखोर्यात पळविणार्या छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आत्मसात केल्यास महाराष्ट्र घडेल, असा विश्वास इतिहासतज्ज्ञ यशवंत गोसावी यांनी व्यक्त केला. संभाजी आरमारच्या वतीने रंगभवन सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या युवक मेळाव्यात यशवंत गोसावी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार विजयकुमार देशमुख, विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीचे सदस्य वसंतराव पाटील, संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, प्रदेश संघटक प्रकाश डांगे, समाधान काळे, डॉ. विजय अंधारे आदी मान्यवर उपस्थित होते.
--------------------------
शेतकर्यांसाठी लढणार - श्रीकांत डांगे
संभाजी आरमार सध्य स्थितीच्या प्रश्नांवर नेहमी लढत असतो. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा आदी विविध क्षेत्रातील अन्याय, अत्याचारांचा बिमोड करण्यासाठी आरमार तयार असते. गारपिटीने शेतकरी हैराण झाला आहे, त्यांना न्याय मिळण्यासाठी आरमार प्रयत्न करीत आहे़भविष्यात शेतकर्यांसाठी लढणार, असे मत यावेळी संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी व्यक्त केले.