सांगोल्यात ४५ दुचाकींवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:16 AM2021-01-01T04:16:07+5:302021-01-01T04:16:07+5:30
सांगोला : अखेर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी बुधवारी सांगोला शहरात वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावर बेशिस्तपणे उभी केलेल्या ४५ दुचाकींवर ...
सांगोला : अखेर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी बुधवारी सांगोला शहरात वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावर बेशिस्तपणे उभी केलेल्या ४५ दुचाकींवर दंडात्मक कारवाई करुन २२ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला.
सांगोला तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर नागरिक दुचाकी बेशिस्तपणे लावतात. नागरिकांना कार्यालयात येताना अडथळ्यांचा सामना करावा लागत होता. चक्क तहसीलदार अभिजीत पाटील यांनाही याचा अनुभव आला. त्यांनी प्रवेशद्वारावर ‘नो पार्किंग’ फलक लावले होते. वारंवार सांगूनही दुचाकीस्वारांमध्ये सुधारणा होत नसल्याने बुधवारी तहसील कार्यालयासमोर रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. हे नित्याचे झाले होते. सांगोला वाहतूक शाखेचे पोलीस नाईक संजयकुमार पवार, पोलीस कॉन्स्टेबल लालासाहेब कदम , पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर शिंदे, होमगार्ड बंडगर, माने यांच्या पथकाने सांगोला तहसील कार्यालय, कचेरी रोड , राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात वर्दळीच्या ठिकाणी वाहनांवर कारवाई करण्यात आली.